CEO मानेंवर अविश्वास ठराव मांडणार : जि.प. अध्यक्षा शालिनी विखे

अहमदनगर : पोलीसनामा  ऑनलाईन – माजी सैनिकाच्या शिक्षिका पत्नीच्या बदलीबाबत वारंवार सांगूनही जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी बदली केली नाही, याच्या निषेधार्थ त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. त्यासाठी दि. ८ जुलै रोजी विशेष सभा बोलाविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

माजी सैनिकांच्या पत्नीचे विनंती बदली न झाल्याने संतापलेल्या अध्यक्ष शांताराम यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून सभात्याग केला होता. याबाबत जिल्हा परिषदेची तहकूब सभा व विशेष सभा ही दि.८ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्यावर अविश्वासाचा ठराव होणार आहे. तो ठराव शासनास पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्षा विखे यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा घुले, विषय समित्यांचे सभापती अनुराधा नागवडे, जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे व सीईओ माने यांच्यातील मतभेद आज झालेल्या सर्वसाधारण सभेत चव्हाट्यावर आले. एका बदलीचे निमित्त करून विखे यांनी माने यांच्यावरील नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली व स्वतः सभात्याग केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

तणावग्रस्त महिलांना मासिक पाळीत होतो जास्त त्रास

दातांचे आरोग्य राखण्यासाठी ‘ही’ माहिती आहे खूप आवश्यक

तणावामुळे जुनी दुखणी होतात अधिक गुंतागुतीची

फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य

हाडांमधून वारंवार आवाज येणे हे भविष्यातील समस्यांचे लक्षण

सिनेजगत

‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीला होतं अश्‍लील व्हिडीओ पाहण्याच ‘व्यसन’

डॉल्फिनसोबतच्या ‘त्या’ फोटोंमुळे अभिनेत्री क्रिस्टल डिसुजा झाली ‘ट्रोल’