Cervical Treatment | सर्व्हायकलने केले असेल जगणे अवघड, तर ‘या’ पद्धतीने दूर होतील वेदना, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cervical Treatment | सर्व्हायकल स्पॉन्डिलीसिसमुळे (Cervical Spondylosis) मानदुखी (Neck Pain) आणि चक्कर येण्याची समस्या सुरू होते. सर्व्हायलक स्पाईनच्या कमकुवतपणामुळे हे होते. पण, सर्व्हायकलच्या वेदना (Cervical Pain) कमी करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. या नेक एक्सरसाईजमुळे (Neck Exercise For Cervical) सर्व्हायकलची लक्षणे कमी होण्यास मदत होते. सर्व्हायकलच्या वेदना कमी करण्यासाठीच्या व्यायामांबद्दल जाणून घेऊया (Cervical Treatment).

 

या नेक एक्सरसाईजमुळे सर्व्हायकलच्या वेदनेमध्ये मिळेल आराम (Exercise For Cervical) :

 

1. नेक स्ट्रेच (Neck Stretch)

सर्वप्रथम, शरीर सरळ ठेवून बसा.

आता तुमची हनुवटी पुढे सरकवा.

जोपर्यंत तुम्हाला मानेवर ताण जाणवत नाही तोपर्यंत हे करा.

5 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर आपले डोके सामान्य स्थितीत न्या.

यानंतर, डोके मागे नेत, हनुवटी वर करा आणि 5 सेकंद थांबा.

असे 5 वेळा करा (Cervical Treatment).

 

2. नेक टिल्ट (Neck Tilt)

कंबर सरळ ठेवून बसा आणि तुमची हनुवटी खाली करा.

आपल्या हनुवटीने छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

5 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर सामान्य स्थितीत या.

हे किमान 5 वेळा करा.

3. साइड टू साइड नेक टिल्ट (Side To Side Neck Tilt)

सरळ बसून मान एका बाजूला झुकवा.

जेव्हा तुमचे कान खांद्याला स्पर्श करू लागतील तेव्हा थांबा.

सुमारे 5 सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर, सामान्य स्थितीत या.

आता डोके सामान्य स्थितीत घेऊन, मान दुसर्‍या खांद्याकडे टेकवा आणि 5 सेकंद त्या स्थितीत रहा.

असे 5 वेळा करा.

 

4. नेक टर्न (Neck Turn)

कंबर सरळ करून बसा आणि मान एका बाजूला वळवा.

मान जमेल तितकी फिरवा आणि सुमारे 5 सेकंद या स्थितीत रहा.

आता मान सामान्य स्थितीत आणा आणि नंतर दुसर्‍या बाजूला फिरवा.

असे 5 वेळा करा.

 

Web Title :- Cervical Treatment | cervical treatment neck pain exercise solution stretch rotation circle

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गुरुवार पेठेतील अमोल आंदेकरच्या जुगार अड्ड्यावर छापा; २३ जणांवर कारवाई, पावणेतीन लाखांचा माल जप्त

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Eknath Shinde | नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट व्हायरल