CET | अभियांत्रिकी प्रवेशासाठी CET घेणार नाही, 10 वीच्या गुणांवर प्रवेश; उदय सामंत यांची मोठी घोषणा

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – (CET) अभियांत्रिकी (Engineering Admission) महाविद्यालयांच्या फी (College fee) संदर्भात पाच लोकांची सदस्यीय समिती नेमली आहे. समितीला (Committee) एक महिन्यामध्ये आपला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश विजय आचलिया (Retired Judge Vijay Achaliya) हे आहेत. दहावीच्या मार्कलिस्टच्या आधारेच तंत्रशिक्षण विभागाचे (Department of Technical Education) प्रवेश होतील, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister of Higher and Technical Education Uday Samant) यांनी आज सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते.

पॉलेटेक्निकचे प्रवेश 10 वीच्या मार्क्सवर

उदय सामंत यांनी सांगितले की, पॉलिटेक्निकचे (Polytechnic) प्रवेश (Admission) हे 10 वी च्या मार्क्सवर असणार आहेत. दसुऱ्या वर्षी प्रवेश घेताना 14 विषयांपैकी 3 विषय (Subject) आवश्यक आहेत. काही पॉलिटेक्निक व इंजिनियरींग कॉलेजसाठी (Polytechnic and Engineering College) मराठीतून (Marathi) अभ्यासक्रम (Course) सुरु करण्यासाठी Aicte कडे परवानगी (Permission) मागितली आहे. पॉलिटेक्निकरता सीईटी (CET) घेणार नाही. दहावीच्या गुणांवर प्रवेश दिला जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

सीमाप्रश्नातील वादग्रस्त शब्द काढून टाकला

वादग्रस्त (Controversial) सीमाप्रश्नातील वादग्रस्त हा शब्द काढून टाकला आहे. आता केवळ सीमाप्रश्न उल्लेख काढला असून आता सीमाभागातील मुलांचा प्रवेश असा उल्लेख केला जाईल. विस्थापित काश्मीरी पंडितांबरोबरच (Kashmiri Pandit) तिथं स्थायिक असणाऱ्या काश्मिरी पंडितांना प्रवेश दिला जाईल, असेही उदय सामंत म्हणाले.

हे देखील वाचा

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 172 नवीन रुग्ण, 253 रुग्णांना डिस्चार्ज

 

pune municipal corporation | पहिल्या तिमाहीत महापालिकेचे उत्पन्न घटले; महागाई व वेतनामुळे खर्च वाढला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  CET | will not take cet for engineering admission admission on 10th marks said uday samant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update