Chadani Chowk | दिल्लीजवळील ट्विन टॉवर जमीनदोस्त करणारी कंपनी पुण्यातील पूल पाडणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी दिल्लीजवळील ट्विन टॉवर (Twin Tower) इमारत कंट्रोल एक्स्ल्पोजन सिस्टिमद्वारे (Control Explosion System) अवघ्या 9 सेकंदात पाडण्यात आली. जगातील सर्वात उंच इमारत जमीनदोस्त करण्यासाठी 3 हजार 700 किलो वजनाच्या स्फोटांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर आता असाच कंट्रोल ब्लास्टिंगचा (Control Blasting) अनुभव पुणेकरांना येणार आहे. पुणे-मुंबई हायवेवरील (Pune-Mumbai Highway) चांदणी चौकात (Chadani Chowk) वाहतुक कोंडीला कारण ठरलेला पुल अवघ्या दहा सेकंदात पाडला जाणार आहे. यामुळे चांदणी चौकातील (Chadani Chowk) वाहतूक कोंडी (Traffic Jam) सोडवण्यासठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.

 

चांदणी चौकातील (Chadani Chowk) ही वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दिल्लीतील ट्विन टॉवर पाडणाऱ्या Eifice Engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. ही कंपनी दिल्लीतील ट्वीन टॉवर पाडण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता त्याचाच वापर चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी करणार असून, अवघ्या 10 सेकंदात येथील पूल जमीनदोस्त होणार आहे. यासाठी पूल आणि परिसराची माहिती घेण्यासाठी नोएडाहून एक पथक पुण्यात येणार आहे.

पूल पाडण्यासाठी कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीचा वापर होणार आहे.
12 ते 15 सप्टेंबर दरम्यान हा पुल पाडला जाईल अशी माहिती आहे.
वाहतूक कोंडी होत असल्याने हा पूल पाडून दुसरा पूल बांधला जाणार आहे.
त्यासाठी हा पूल पाडून लवकर कामाला सुरुवात होणार आहे.
चांदणी चौकातील हा पूल 30 मीटर लांबीचा आहे.
पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर्सप्रमाणेच स्फोटकांचा वापर केला जाणार आहे.
त्यापूर्वी वाहतूकीचे नियोजन करण्यात येणार आहे.
पुल पाडण्यापूर्वी दोन ते तीन तास पुलाखालचा रस्ता वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.

 

Web Title :- Chadani Chowk | traffic jam in chadani chowk edifice engineering demolish the bridge at chandni chowk pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा