छगन भुजबळांचं पुन्हा EVM वर बोट, म्हणाले – ‘मतमोजणी 22 ऑक्टोबरला का नाही ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी निकालाच्या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नुकतेच निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली. २१ ऑक्टोबरला मतदान झाल्यावर लगेच पुढील दिवशी मतमोजणी का केली जाणार नाही ? असा सवाल करत भुजबळांनी इव्हिएम बाबत शंका उपस्थित केली आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरची घोषणा केली आणि निकाल दोन दिवसानंतर २४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असल्याचे सांगितले. मात्र छगन भुजबळ यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महाराष्ट्रात एकूण ८.९४ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी १.८ लाख इव्हिएमचा वापर होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर असणार आहे. तर अर्ज छानणी ५ ऑक्टोबरला होणार आहे. ७ ऑक्टोबर पर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात.

कसे होते २०१४ चे राज्यातील चित्र
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि महायुती हे दोघेही वेगवेगळे लढले होते. त्यामुळे एक वेगळे चित्र निर्माण झाले होते. या विधानसभेला आघाडीची घोषणा झाली आहे मात्र युतीचा निर्णय अद्याप बाकी आहे.

एक नजर आधीच्या विधानसभेच्या आकडेवारीवर
भाजप –
१२२
शिवसेना – ६३
काँग्रेस – ४२
राष्ट्रवादी काँग्रेस – ४१
इतर – २०
Visit :- policenama.com

You might also like