Chagan Bhujbal | पीएफआय संदर्भात धक्कादायक माहिती समोर, छगन भुजबळ म्हणाले- ‘यापूर्वीच तपास आणि गुप्तचर यंत्रणांना हे…’

0
401
Chagan Bhujbal | In front of the shocking information regarding PFI, Chhagan Bhujbal said- 'Earlier this to the investigation and Gupchar agencies...'
file photo

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) या संघटनेविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे. देशात एवढी मोठी संघटना उफाळून आली आणि गुप्तचर यंत्रणांना त्याची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी दिली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीया (PFI) या संस्थेच्या मॉडेल 2047 च्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राम मंदिर (Ram Mandir) पाडून पुन्हा त्या ठिकाणी बाबरी मशीद (Babri Masjid) उभारण्याचा पीएफआयचा डाव आहे. तसेच संपूर्ण भारत देशाला मुस्लिम राष्ट्र (Muslim Nation) बनविण्याचे देखील कट आखण्यात आले होते. पीएफआयवर केंद्र शासनाने पुढील सहा वर्षांसाठी बंदी घातली आहे. तसेच देशभरातून पीएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनच ही माहिती कळाल्याचे नाशिक न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान वकिलांनी सांगितले. राष्ट्रविघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पीएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांना देशभरातून अटक करण्यात आली होती.

यावर भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली असता, ते म्हणाले, या प्रकरणात काय पुरावे हस्तगत
झाले त्याबाबत मला माहिती नाही. सापडलेल्या पुराव्यांची न्यायालय चिकित्सा करेल.
मात्र, भारतात एवढी मोठी संघटना फोफावली आणि त्यांचे हे वाईट हेतू होते,
तर यापूर्वीच तपास आणि गुप्तचर यंत्रणांना हे कळायला हवे होते.
ही संघटना फोफावेपर्यंत गुप्तचर यंत्रणांना काही माहित नव्हते.
पण आता उशिरा का असेना, सर्व प्रकार समोर आला आहे, तर त्यावर न्यायालय योग्य ती कारवाई करेल,
असे छगन भुजबळ म्हणाले.

Web Title :- Chagan Bhujbal | In front of the shocking information regarding PFI, Chhagan Bhujbal said- ‘Earlier this to the investigation and Gupchar agencies…’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा