Chagan Bhujbal | तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून? छगन भुजबळांनी दिले उत्तर, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे माजी नेते आणि आता राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) हे 75 वर्षांचे झाले आहेत. त्यामुळे त्यांची पंच्याहत्तरी साजरी करण्यासाठी मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांच्याकडे येवढी संपत्ती आली कुठून, या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. भायखळ्याच्या भाजी मंडईत (Vegetable Market) पहाटे तीन वाजल्यापासून आम्ही भाजी विकायचो. त्यानंतर भाजी विकण्यासाठी कंत्राट कंपन्यांना दिले गेले. हळूहळू आम्ही कंपन्या सुरु केल्या. आणि त्यातून पैसा उभा राहिला, असे छगन भुजबळांनी सांगितले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar), फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ (Changan Bhujbal) यांनी आपल्या संघर्षाचा प्रवास सांगितला.

 

माझी एकसष्टी शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) साजरी झाली. त्यावेळी देखील शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला होते. इतरही लोक होते. पण त्यावेळचे दोन लोक आता नाहीत. गोपिनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) आज हयात नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना देखील या समारंभाचे आमंत्रण दिले होते. पण इतर कामांत व्यग्र असल्याने ते आले नाहीत. त्यांच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत, असे आपण गृहीत धरुया, असे भुजबळ म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्र्यांवर भाष्य केले. देशात सध्या दाढीवाल्यांचे राज्य आहे. कुठे पांढरी दाढीवाले आहेत, तर कुठे काळी दाढीवाले आहेत. त्यामुळे मी देखील दाढी ठेवतो आहे, असे भुजबळ (Changan Bhujbal) म्हणाले.

लहानपणी आई-वडील गेले. मावशीने माझगावात दहा बाय बाराच्या खोलीत मावस भावाचे आणि माझे संगोपण केले.
कॉलेजमध्ये मला अनेक पारितोषिके मिळाली. शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची एक सभा होती.
त्यावेळी मी त्या सभेला गेलो. त्या सभेला प्रबोधनकार ठाकरे होते. त्यानंतर आम्ही शिवसेनेच्या विचारांसोबत बांधले गेलो.
मी माझगावमध्ये शाखाप्रमुख व्हायला हवे, असे मला सांगण्यात आले आणि मी झालो.
त्यामुळे शिवसेनेच्या पहिल्या दहा बारा शाखाप्रमुखांमध्ये मी देखील आहे, अशी आठवण भुजबळ यांनी सांगितली.
1973 साली एक रुपयाही खर्च न करता, मी पहिल्यांदा निवडून आलो. अशा अनेक आठवणी आणि किस्से छगन भुजबळ यांनी सांगितल्या.

 

Web Title :- Chagan Bhujbal | ncp mla chhagan bhujbal taliking about his 75 years journey in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळत आहेत; ‘मशाल चिन्ह मिरवून झाल्यावर …’ नरेश म्हस्के यांचा हल्लाबोल

Eknath Khadse | विरोधी पक्ष विखुरलेले राहावेत, तसं भाजपचं कारस्थान असू शकतं, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली शंका

Pune Motor Driving School | महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन