राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ‘या’ 2 नावांवर शिक्कामोर्तब, छगन भुजबळांनी सांगितलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात लवकरच राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक असून शिवसेना काँग्रेस,राष्ट्रवादी,भाजप हे पक्ष राज्यसभेसाठी कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असता.अन्न व नागरी पुरवठा मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि नेत्या फौजिया खान राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा सुरु होती त्यावर छगन भुजबळ यांनी शिक्कामोर्तब करत राष्ट्रवादीकडून हेच दोघे राज्यसभेवर जाणार असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार असून निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदल्याने भाजपाच फक्त २ सदस्य निवडून येण्याची शक्यता असून महाविकास आघाडीचे जास्तीचे उमेदवार निवडून येण्याची येण्याची शक्यता आहे. २६ मार्च २०२० रोजी राज्यसभेच्या ७ जागांसाठी राज्यात निवडणूक असून निकाल याच दिवशी जाहीर होणार आहे.

खडसे राज्यसभेत जाणार ?
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राजकीय भवितव्य ११ मार्च नंतर ठरणार असून एकनाथ खडसेंना राज्यसभेत पाठवण्यसाठी राज्यातील नेते आग्रही आहे. मात्र खडसे स्वतः विधान परिषेद जाण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रसह १७ राज्यांच्या राज्यसभेतील ५५ जागांसाठी २६ मार्च २०२० ला मतदान घेण्यात येणार असून,६ मार्चला निवडणूक अधिसूचना जरी होईल. उमेदवारांना अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ मार्च असून १६ मार्चला अर्जांची छाननी होईल. १८ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेता येणार आहे. तर २६ मार्चला ला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजे पर्यंत मतदान घेण्यात येणार. तर दुपारी ५ वाजता मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.