विधानसभा तोंडावर आल्याने फडणवीस सरकारकडून घोषणांचा ‘अवकाळी’ पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेत आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला गेला. त्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली असून राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प मांडला गेल्याने सभागृहाची परंपरा पायदळी तुडविली गेली आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून घोषणांचा अवकाळी पाऊस. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प मांडला गेल्याने सभागृहाची परंपरा पायदळी तुडविली गेली आहे.

भाजप शिवसेना युती सरकारच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. त्यानंतर हा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्याआधीच ट्विटरवर सुधीर मुनगंटीवार यांनी फोडला असल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी सरकारवर टीका करत विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून घोषणांचा अवकाळी पाऊस पडला आहे. तर विरोधी पक्ष विधानसभेत अनुपस्थित असताना अर्थसंकल्प मांडला गेल्याने सभागृहाची परंपरा मोडली असल्याचे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन