साता समुद्रापार पोहोचलेला ‘चहल टीव्ही’ आता चंद्रावरही जाणार ?

नेपीयर : वृत्तसंस्था – नुकतीच साता समुद्रापार ऑस्ट्रेलियामध्येही ‘चहल टीव्ही’ची धुम पाहायला मिळाली. परंतु अशी माहिती समोर आली आहे की, आता तर हा टीव्ही थेट चंद्रावर जाणार आहे. भारतीय संघामध्ये युजवेंद्र चहल हा एक चांगला फिरकीपटू आहे. पण त्याची ओळख फक्त एवढीच नाही. कारण एका सामन्यानंतर एखाद्या खेळाडूने दमदार कामगिरी केली असेल तर तो त्यांची मुलाखत घेतो.

युजवेंद्र चहल याने ऑस्ट्रेलियातील सामना जिंकल्यावर ‘चहल टीव्ही’मध्ये केदार जाधवची मुलाखत घेतली. केदार जाधवने त्या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यामुळे सामन्यानंतर केदारची खास मुलाखत ‘चहल टीव्ही’मध्ये घेण्यात आली होती.

यावेळी बाेलताना केदार म्हणाला की, मी अनेकांकडून चहल टीव्हीबद्दल अनेकांकडून ऐकलं आहे. मी जेवढं ऐकलं आहे त्यानुसार चहल टीव्ही आधीच खूप फेमस आहे. आता चहल टीव्ही साता समुद्रावर पार आला आहेच परंतु आता याच चहल टीव्हीला मी चंद्रावर नेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारताच्या संघाचे काल न्यूझीलंडमध्ये आगमन झाले आहे. यामध्ये भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. दरम्यान  या दौऱ्याला 23 जानेवारीला पहिल्या एकदिवसीय सामन्याने सुरुवात होणार आहे.