‘प्रस्थानम’ सिनेमाच्या सेटवर मनिषा कोईरालानं चाहत खन्नाच्या 5 वेळा ‘कानशिलात’ लगावली

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान सेट वर चांगल्या वाईट अशा अनेक घटना घडतात. ज्या लोकांसाठी काही काळ चर्चेचा विषय ठरतात. तसेच ज्यांच्या सोबत अशा घटना घडतात त्यांना त्या कायम लक्षात राहतात. अशीच एक घटना प्रस्थानम चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सेट वर घडली आहे. ती म्हणजे, सुप्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला ने चाहत खन्ना च्या कानाखाली ५ चपराक लगावल्या आहेत.

संजय दत्त यांच्या प्रस्थानम या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अशीच एक घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्थानाम च्या सेट वर मनीषा कोईराला ने चाहत खन्ना च्या कानाखाली ५ चपराक मारल्या आहेत.

त्याचं झालं असं की, चित्रपटाच्या एका सिन साठी मनीषाला चाहत खन्ना च्या कानाखाली चपराक मारावयाची होती. असा तो सिन होता. परंतु, प्रयत्न करूनही मनीषाला योग्य वेळी चाहतच्या कानाखाली चपराक मारता येत नव्हती. मानसिक स्तरावर कणखर होऊन चपराक मारण्यासाठी ती धजत नव्हती. त्यासाठी प्रथम तिला मानसिकरीत्या तयार व्हावे लागले.

अनेकवेळा रिटेक घेतल्यानंतर भेटला परफेक्ट शॉट
अनेक वेळा रिटेक घेतल्यानंतर अखेर पाचव्या वेळेस दिग्दर्शकाला परफेक्ट शॉट मिळाला. त्यासाठी चाहत खन्नाला मनीषा कडून तब्बल ५ चपराकी खाव्या लागल्या. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांच्या पत्नी मान्यता दत्त या प्रस्थानाम चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. हा चित्रपट राजकीय घडामोडीवर आधारित चित्रपट आहे.

चित्रपटात संजय दत्त यांच्या शिवाय मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, अली फझल, चंकी पांडे, चाहत खन्ना महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट प्रस्थानाम या २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या साऊथ च्या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट येत्या २० सप्टेंबर रोजी सर्व चित्रपटग्रहात प्रदर्शित होणार आहे.