अभिनेत्री चाहत खन्नाची चीनला धडा शिकवण्याची इच्छा, फॅन्सला म्हणाली – ‘चायनीच वस्तूंना बॉयकॉट करा’

पोलीसनामा ऑनलाइन – बडे अच्छे लगते है फेम अ‍ॅक्ट्रेस चाहत खन्ना सध्या चर्चेत आली आहे. याचं करण म्हणजे तिनं चीनविरोधात हल्ला बोल केला आहे. कोरोना व्हायरससाठी चीनला जबाबदार धरत तिनं चायनीज प्रॉडक्ट्सवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं आहे.

चाहत म्हणाली की, “कोरोना व्हायरस आणण्यासाठी चीन सर्वात पुढं आहे. आम्हाला माहित आहे की, या व्हायरसमागील कारण काय आहे. आपण मिळून त्यांना धडा शिकवायला हवा. आपण चीनी सामान बॉयकॉट करायला हवं.”

https://www.instagram.com/p/CBV1uPun-CG/

चाहत पुढे म्हणते, “चायनीज सामान आणि त्यांची सेवा यांच्यावर बहिष्कार टाकत आपण एक पाऊल पुढं जात आहे. यामुळं भारतीय कंपन्यांना खूप फायदा होणार आहे. जर 1.3 बिलिन भारतीयांनी असं केलं तर हा खूप मोठा झटका असेल. ते बॉर्डरवर आपली जमीन हडपण्याचाही प्रयत्न करत आहेत. आता त्यांना दाखवून द्यायला हवं की, आपली ताकद काय आहे. हीच योग्य वेळ आहे.”

https://www.instagram.com/p/CBDyRSKHTMB/

चाहतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तिनं आणि मीका सिंग यांनी एक म्युझिक व्हिडीओ साँग केलं होतं. क्वारंटाईन लव असं या गाण्याचं नाव होतं. यात ती मीकासोबत रोमँस करताना दिसली होती. चाहतनं अनेक मालिका आणि सिनेमात काम केलं आहे. बडे अच्छे लगते हैं आणि कबूल है या तिच्या फेमस मालिका आहेत. थँक यु आणि प्रस्थानम असे तिचे काही सिनेमे सांगता येतील.

https://www.instagram.com/p/CA0OjERnOas/

https://www.instagram.com/p/CAvDfFWnuwu/

https://www.instagram.com/p/B_U-VE3nSa2/