चाईबासा : भाजपच्या माजी आमदाराच्या दुसर्‍या पत्नीवर बनावट नोटा खपवण्याचा आरोप

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – चाईबासामध्ये भाजपच्या माजी आमदाराच्या पत्नीवर बाजारात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा खपवण्याचा गंभीर आरोप लावला आहे. इतकेच नव्हे तर बनावट नोटा खपवण्याच्या आरोपाखाली लोकांनी भाजपच्या माजी आमदाराच्या पत्नीला जाब विचारला असता, त्यांनीही लोकांवर चाकूने हल्ला केला. आता हे संपूर्ण प्रकरण चाईबासाच्या मुफस्सिल पोलिस स्टेशनला पोहचले आहे.

बनावट नोटा खपवल्याचा आरोप लावलेली महिला चाईबासा येथील भाजपाचे माजी आमदार पुटकर हेमब्रम यांची दुसरी पत्नी मलाया हेम्ब्रम आहे. लोकांचे म्हणणे आहे की, काही दिवसांपासून मलाया हेम्ब्रम सतत मार्केटमधील विविध दुकानात बनावट नोटा देत होत्या. ज्या दुकानदारांनी या नोटा घेतल्या होत्या त्यांनी बँक व एटीएममध्ये जमा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी त्या महिलांकडून पैसे घेतलेल्या नोटा बनावट असल्याचे समजले. दुकानदारांनी मलयाला ओळखले होते.

कपड्यांच्या दुकानातून मासे विक्रेत्यापर्यंत मलायाने दोन हजारांच्या बनावट नोटा दिल्या होत्या. पुन्हा जेव्हा मलया खरेदीसाठी बाजारात गेल्या तेव्हा त्यांना दुकानदारांनी घेरले आणि दोन हजारांच्या बनावट नोटा त्यांना देऊन आपले पैसे मागितले पण मलायाने पैसे बदलण्यास नकार दिला. त्यानंतर वाद सुरू झाला.

पोलिस स्टेशनमध्ये सर्व दुकानदार आणि जखमी महिलांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात रात्री उशिरा पोलिसांनीही अनेक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती आहे. ज्यात पोलिसांना बनावट नोटांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण पुरावे सापडले आहेत. पोलिस लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार आहेत.