सोनसाखळी चोरांना हडपसर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

हडपसर परिसरात सोनसाखळी चोरणाऱ्या तीन गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांकडून सोनसाखळीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. या आरोपींना हडपसर पोलिसांनी जनसेवा बँकेच्या बसस्टॉपजवळ अटक केली होती.

साई लिंगाप्पा जाधव, बसवराज चंदु जाधव, शुभम दशरथ सुर्यवंशी (तीघे रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बीआरटी मार्गात पीएमपीएमएल पडली बंद

हडपसर पोलीस ठाण्यातील तपस पथकाचे कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत असातना पोलीस शिपाई अमित कांबळे यांना तीन आरोपी जनसेवा बँकेच्या जवळील बस्टॉपजवळ संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून तीघांना अटक केली. आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी सोनसाखळी चोरल्याचे कबूल केले. या गुन्ह्यातील दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ddb241c5-aa07-11e8-8868-117685a0ec4c’]

ही कारवाई परिमंडळ – ५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, हडपसर विभागाचे साहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील, हडसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस हवालदार युसुफ पठाण, पोलीस नाईक कुसाळकर, पोलीस शिपाई अमित कांबळे, शाहिद शेख, ज्ञानेश्वर चित्त, नितीन मुंढे, अकबर शेख, शशीकांत नाळे यांच्या पथकाने केली.