दोन सोनसाखळी चोर गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीरामपुर येथील दोन चोरट्यांकडून वर्षभरापुर्वी चोरलेल्या सोनसाखळी जप्त करत दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गजाआड केले आहे. धुळे शहरात मागील वर्षभरापूर्वीपासून सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल
असून दाखल गुन्ह्याच्या तपासाकरीता वरिष्ठ अधिकारी यांनी सदर गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखा पथकास सूचीत केले होते.

पोलीस निरीक्षक हेमंत पाटील स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांनी त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील ईराणी टोळीचे माहिती काढण्यास सांगितले. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी श्रीरामपूर येथील ईराणी टोळीतील कासीम गरीबशहा ईराणी (वय- ३० वर्षे, रा. ईराणी वस्ती, वॉर्ड नं.१, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) व कंबर रहीम मिझ (वय- ३१ वर्षे, रा. मदर टेरेसा सर्कल, वॉर्ड नं. १, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी शहरातील पश्चिम देवपूर, देवपूर व धुळे शहर पोलीस स्टेशन हद्दीत सोनसाखळी जबरीने चोरी केल्याचे कबुली दिली. त्यांचेकडून ६ तोळे ९०० मि. ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोरलेले दागिने हस्तगत करून एकूण ४ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

वरील कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक
हेमंत पाटील, स्था.गु.शा.यांचे पथकातील पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलीस उप निरीक्षक हनुमान उगले, जगतसिंग महाले, पो.ना. प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, कुणाल पानपाटील, पो.कॉ. उमेश पवार, रविकिरण राठोड, गुलाब पाटील, मनोज बागुल व केतन पाटील यांनी केली आहे.

Loading...
You might also like