थरार ! आई आणि मुलीच्या धाडसामुळं साखळी चोराला घडली ‘अद्दल’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नांगलोईत महिलेने चेन स्नॅचर्सशी लढा दिला याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दिल्ल्लीच्या रस्त्यांवरील ही घटना आहे. आई आणि मुलीने मिळून मोठ्या धाडसाने गळ्यातील चैन ओढणाऱ्याला पकडले आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की आई आणि मुलगी रास्ता ओलांडत आहेत इतक्यात दुचाकीवर दोन जण येतात आणि आईच्या गळ्यातील चैन ओढतात. तितक्याच तत्परतेने ती महिला त्या सोनसाखळी चोरालाही ओढते आणि तो दुचाकीवरून खाली येतो. इतक्यात त्या महिलेची मुलगीही त्या चोराला जोरात पकडते. दोघेही चोराशी भांडू लागतात.

आपल्या साथीदाराला पकडलेले पाहून त्याचा साथीदार गाडी तिथेच टाकून पळून जातो आजूबाजूचे लोक लगेच येतात आणि त्या चोराला मारायला सुरुवात करतात हा सगळा प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

महिलेच्या तत्परतेने आणि सावधानाने साखळी चोर अडकला मात्र त्याचा साथीदार तेथून पसार होण्यास यशस्वी झाला. आई आणि मुलीच्या धाडसामुळे हा चोर पकडला गेल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –