काँग्रेस नगरसेविकेच्या गळ्यातील मंगळसूत्र महीलेने हिसकावले

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – इंदापूर नगरपालिकेच्या नगरसेविका अनिता रमेश धोत्रे (वय ४५ वर्षे) राहणार वडारगल्ली इंदापूर ता. इंदापूर, जि. पूणे, यांचे गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र रेखा परशुराम जाधव, राहणार वडारगल्ली इंदापूर या महिलेने  हिसकावून पळवून नेल्याची फिर्याद नगरसेविका अनिता धोत्रे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

फिर्यादीत अनिता धोत्रे यांनी म्हटले आहे की आम्ही वडारगल्ली इंदापूर येथे सहकुटुंब राहणेस असून  इंदापूर नगरपालिका येथे नगरसेवक म्हणून मी काम पाहते. रविवार दिनांक २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ९:३० वा. चे सुमारास मी, माझे पती रमेश धोत्रे, माझा मुलगा तुषार रमेश धोत्रे, व माझी बहीण मनिषा आण्णाराव चौगुले असे आम्ही चौघे शासकीय गायराण जागेची पाहणी करुन मोजमाप करीत असताना त्या जागेवर १) लक्ष्मीबाई शंकर जाधव, २) परशुराम शंकर जाधव, ३) रेखा परशुराम जाधव, ४) दत्तात्रय (गोटया) शंकर जाधव, ५) मनिषा शिवाजी देवकर, ६) सारिका तानाजी गुजाळ, ७) जनाबाई (अक्कुबाई) शंकर जाधव, ८) वैशाली दत्तात्रय जाधव हे  सर्वजण सदर जागेवर येवुन आम्हांस शिवीगाळ करीत सदर जागेवर बांधकाम मोजमाप करायचं नाही तुम्ही काय आम्हांला पैसे दिले नाही. असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करीत वर नमुद .नं  १ ते ८ यांनी लाथाबुक्यांनी मला मारहाण करताना रेखा परशुराम जाधव हिने माझ्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावुन घेतले.

सदरची भांडणे सोडविण्याकरिता माझा मुलगा तुषार व माझे पती रमेश धोत्रे, तसेच माझी बहीण मनिषा आण्णाराव चौगुले असे तिघेजण  आले असता वरील आठ जणांनी लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून माझी वरील ८ लोकांविरुद्ध कायदेशीर फिर्याद असल्याचे इंदापूर पोलिस स्टेशनला दाखल फिर्यादीत अनिता धोत्रे यांनी म्हटले आसुन दोन तोळ्याचे मंगळसुत्र रेखा जाधव यांनी हीसकावुन नेल्याचे म्हटले आहे. इंदापुर पोलीसांनी फार्याद दाखल करून करून घेतली आसुन आधीक तपास इंदापूर पोलिस करत आहेत.