मुख्यमंत्र्यांच्या शेजारची उपमुख्यमंत्र्यांची खुर्ची ‘रिकामी’च, खरंच अजित पवार ‘चेअर’वर बसणार का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज ‘वर्षा’वर आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या शेजारील उपमुख्यमंत्र्यांची खूर्ची रिकामी असल्याचे दिसले. सत्ता स्थापनेनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर आजच पहिल्या दिवशी वर्षा बंगल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाची खूर्ची रिकामी दिसली.

आज मुख्यमंत्रिपदाचा पदभार देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला परंतू अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ तर घेतली परंतू अजूनही उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतू त्यात अजून यश येताना दिसत नाही.

त्यानंतर आज वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधीसोबत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा पदभार स्वीकारल्यावर बैठक घेतली. यावेळी पूर आणि दुष्काळ व्यवस्थापन कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. या बैठकीची फोटो आता समोर आले आहे. परंतू मुख्यमंत्र्यांच्या बाजूची खूर्ची रिकामी दिसत होती. हे चित्र बरंच बोलकं होतं. मुख्यमंत्री तर चर्चा करत होते परंतू बाजूची उपमुख्यमंत्र्यांची खूर्ची रिकामी होती.

तसे पाहिले तर काही तांत्रिक कारणांनी अजित पवारांनी अजूनही पदभार स्वीकारण्यात आला नाही. तसे या बैठकीत त्यांची उपस्थिती असायलाच हवी असे काही संकेत नाही. कारण उपमुख्यमंत्रिपद वैधानिक नाही. परंतू या चित्रातून हे दिसलं की अजित पवार उपस्थित नव्हते तरी किमान त्यांची खूर्ची तेथे ठेवण्यात आली होती.

Visit : Policenama.com