दीप कन्स्ट्रक्शन कंपनीचे चेअरमन डी. के. नाना जगताप आणि सुवर्णा जगताप यांच्याकडून लासलगावकारांच्या सेवेत 5 ऑक्सिजन मेक मशीन

लासलगाव – पोलीसनामा ऑनलाइन – कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून दीप कंस्ट्रक्शन तर्फे गरजू लोकांसाठी पाच ऑक्सिजन मेक मशिन उपलब्ध करून दिले.

लासलगाव सह निफाड तालुक्यात कोरोना रुग्णांचा वेग वाढला आहे. कोरोना संसर्गाने ग्रामीण भागालाही विळखा घातलेला आहे. लासलगाव व परिसरातील रुग्णसंख्या वाढत आहे. त्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी दीप कन्ट्रक्शनचे चेअरमन डी.के जगताप व सुवर्णा जगताप यांच्यातर्फे पाच ऑक्सिजन मशिन लोकांच्या सेवेसाठी गणेश चॅरिटेबल ट्रस्ट ला हस्तांतरण करण्यात आले.

लासलगावातील सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाच्या विळख्याने सर्वत्र वेढले आहोत. लासलगावात डॉक्टर व समाजातील इतर घटक आपल्या पध्दतीने सर्वतोपरी मदत करताना दिसतात.मात्र ऑक्सिजन सिलेंडरचा सर्वत्र तुटवडा आहे. गावातील त्याची गरज बधता कोरोना पीडित गरजूंना गावातील बॅंका, इतर संस्था, मेडिकल , डॉक्टर आसोशियन, सर्व पतसंस्था व इतर सेवाभावी संस्थांनी जर उपलब्ध करून दिली तर गरीब,गरजू लोकांचा नक्कीच फायदा होईल.