Chakan Accident News | भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, चाकण येथील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Chakan Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरची धडक दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या दुचाकीला बसली. यामध्ये महिलेचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. हा अपघात मेदनकरवाडी येथे सोमवारी (दि.26) सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास झाला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police Station) कंटेनर चालकावर गुन्हा करुन अटक केली आहे.

राणी दिपक गोसावी (वय-40 रा. बंगलावस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पीएमटी चालक धनाजी आत्माराम चव्हाण (वय-44 रा. बंगलावस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बेनाथ सुरतराम जाट (वय-30 रा. प्रतापपुरा पोस्ट बोरडा ता. शहापुर, जि. भीलवाडा राजस्थान) याच्यावर आयपीसी 279, 337, 338, 304(अ) सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बेनाथ जाट हा शिक्रापूर बाजूकडून चाकण च्या दिशेने जात होता. त्याने त्याच्या ताब्यातील कंटेनर (आरजे 06 जीसी 3878) भरधाव वेगाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन हयगयीने व निष्काळजीपणे चालवला. त्यामुळे कंटेनरची धडक मयत राणी गोसावी यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये महिला रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Chakan Murder Case | चाकणमध्ये अल्पवयीन मित्राचा खून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; दोन अल्पवयीन ताब्यात

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका