Chakan Crime | चाकण पोलिसांचा ‘व्हिडिओ गेम’ जुगार अड्ड्यावर छापा, 7 जणांवर FIR

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Chakan Crime | नाणेकरवाडी येथे सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर (gambling den) चाकण पोलिसांना छापा (chakan Crime) मारला. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 4 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 7 जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.4) दुपारी बारा वाजता नाणेकरवाडी येथील तळेगाव चौकात (Talegaon Chowk Nanekarwadi) करण्यात आली.

इलेक्ट्रीक पिंप पॉग मशिन मॅनेजर आप्पासाहेब मनोहर राऊत (वय-32 रा.गुरुप्रसाद सोसायटी, बालाजी नगर, मेदनकरवाडी ता. खेड), मशिन चालक राहुल नागनाथ काटे (वय-23 रा. गणेश नगर, मेदनकरवाडी, ता. खेड मुळ रा. सोनपेठ, जी. परभणी), जुगार खेळाणारा हिरालाल सुरेश पाटील (वय-38 रा. तळेगाव चौक, ता. खेड, मुळ रा. मंगरूळ जि. जळगाव), संजय सुदन सावंत (वय-45 रा. कडाचीवाडी, ता. खेड मुळ रा. तुंबनुक, पश्चिम बंगाल), पाहिजे असलेला आरोपी महालक्ष्मी व्हिडिओ गेम मालक मिठु जयराम ससाणे (रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), जागा मालक बाळासाहेब हनुमंत भुजबळ (रा. चाकण, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नितीन ज्ञानेश्वर गुंजाळ (Nitin Dnyaneshwar Gunjal) यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथील तळेगाव चौक परिसरातील एका किराणामालाच्या
दुकाना शेजारी महालक्ष्मी व्हिडिओ गेम (Mahalakshmi video game) या ठिकाणी पैसे लावून जुगार
खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे चाकण पोलिसांनी शनिवारी दुपारी बारा वाजता या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. यामध्ये 2 लाख 4 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Jalgaon News | मांजाने कापला डॉक्टरचा गळा, प्रचंड खळबळ

BCCI | रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह ! भारताच्या तिन्ही कोचसह चौघे आयसोलेशनमध्ये

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Chakan Crime | Chakan police raid ‘video game’ gambling den, FIR against 7

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update