Chakan Crime | जुगार अड्यावर चाकण पोलिसांचा छापा, जागा मालकासह 10 जणांवर FIR

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Chakan Crime | चाकण शहरातील मार्केटयार्ड जवळ असलेल्या एका जुगार अड्यावर (gambling den) चाकण पोलिसांनी छापा मारला (chakan Crime, police raid) आहे. या कारवाईत चाकण पोलिसांनी 33 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 10 जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी जुगार अड्डा मालक, जागा मालक आणि जुगार खेळणारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.4) दुपारी पावणे चारच्या सुमारास करण्यात आली.

अजय महादेव टाक (वय-22 रा. खंडोबामाळ, चाकण, मुळ रा. परभणी), रोषन भिमराव मानवटकर (वय – 31 रा. म्हाळुंगे, ता. खेड, मुळ रा. नागपुर), सुदर्शन सुनिल आरकडे (वय-22 रा. बलुत आळी, चाकण मुळ रा. केज जि. बीड), गजानन माधवराव खिल्लारे (वय-45 रा. बिडवस्ती, चाकण मुळ रा. कळमनुरी जि. हिंगोली), शुभम अजय कांबळे (वय-24 रा. खंडोबामाळ चाकण, मुळ रा. मुळशी), प्रकाश वासुदेव पाटील (वय-40 रा. चाकण, मुळ रा. बुलढाणा), बालाजी ज्ञानोबा मिसाळ (वय-26 रा. कांगडे वस्ती, चाकण मुळ रा. जालना), अजय अंकुश कांबळे (वय-30 रा. बिडवस्ती, चाकण), जुगार अड्डा मालक हबीब अब्दुल सय्यद (रा. शिरुर) आणि जागा मालक रामभाऊ गोरे (रा. चाकण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यातील (Chakan Police Station) पोलीस शिपाई अशोक मारुती दिवटे (Ashok Maruti Divate) यांनी फिर्याद दिली आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण शहरातील मार्केट यार्डजवळ (market yard) रामभाऊ गोरे
यांच्या मालकीच्या पत्रा शेडमध्ये हबीब सय्यद याने जुगाराचा अड्डा सुरु असून अनेक लोक पैसे लावून जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे चाकण पोलिसांनी शनिवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर कारवाई केली.
यामध्ये 33 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा (Maharashtra Gambling Act),
साथीचा रोग अधिनियम (Epidemic Act), राष्ट्रीय आपत्ती अधिनियम (National Disaster Act), महाराष्ट्र कोवीड-19 उपाययोजना कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Web Title : Chakan Crime | Chakan police raids gambling den, FIR against 10 including landlord

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rain in Maharashtra | येत्या 5 दिवसांत मुंबईसह पुण्यात ‘धो-धो’ पाऊस, नंदुरबार वगळता पावसाची राज्यात सर्वदूर बरसणार

Dhananjay Munde | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यातील 21 वर्षीय तरूणीला आईचं दुसर्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं समजलं, ब्रॉयफ्रेन्डच्या मदतीनं केलं असं काही…