Chakan Crime | गुटखा साठवणूक आणि विक्री प्रकरणात पोलिसांची 2 ठिकाणी मोठी कारवाई, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Chakan Crime | शासनाने गुटखा विक्री आणि त्याची साठवणूक करण्यास बंदी घातली आहे. असे असताना गुटखा विक्रीसाठी साठवून (gutka storage) ठेवल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) चाकण (Chakan Crime) येथे दोन ठिकाणी छापे मारले. ही कारवाई चाकण परिसरात गुरुवारी (दि.29) दुपारी पाचच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमध्ये 17 लाख 89 हजार 592 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने पहिली कारवाई आंबेठाण ते वासुली फाटा रोडवरील महिंद्रा सीआई कंपनीच्या (Mahindra CI Company) पार्किंगमध्ये केली. या कारवाईत 10 लाख 11 हजार 600 रुपये किमतीचा तंबाखूजन्य गुटखा, 2 लाख 90 हजार रुपये किमतीची गाडी असा एकूण 13 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी वाहन चालक अभिषेक विलास सोनवणे (वय-21 रा. मेदनकरवाडी, बालाजीनगर, चाकण), कामगार अनुराग अजयनारायण पंडीत (वय-26 रा. दवने वस्ती, म्हाळुंगे मुळ रा. कुढोंढ ता. जालोम, उत्तर प्रदेश) पाहिजे असलेले आरोपी गुटखा मालक कुल्लु गुप्ता (वय 40 रा. देवेंद्र अपार्टमेंट पाठीमागे, चाकण-शिक्रापूर रोड, चाकण) यांच्या विरोधात महाळुंगे (ई) पोलीस चौकीत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

दुसऱ्या कारवाईत हनुमंत भिकाजी मेदनकर यांच्या राहत्या घराच्या बिल्डिंगमध्ये साठवून ठेवलेला गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी या कारवाईत 4 लाख 87 हजार 992 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सौरभ रनविजय तिवारी (वय-26 रा. पी.के. कॉलेज जवळ, मेदनकरवाडी, चाकण), पवनसिंग रघुविर सिंग (व-28 रा. कडाचीवाडी, चाकण) पाहिजे असलेले आरोपी कृष्णमुरारी उर्फ कल्लु गुप्ता (वय-36 रा. देवेंद्र पार्क कडाचीवाडी, चाकण), अंकुर गुप्ता (वय-38 रा. बिरदवाडी, चाकण), हनुमंत भिकाजी मेदनकर (वय-35 रा. मेदनकरवाडी चाकण) यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ (Deputy Commissioner of Police Sudhir Hiremath),
सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (Assistant Commissioner of Police Dr. Prashant Amritkar),
सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील
पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंह सिसोदे, धैर्यशील सोळंके, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुंडे,
गणेश कारोटे, भगवंता मुठे, अनिल महाजन, राजेश कोकाटे, जालिंदर गारे, सोनाली माने यांच्या पथकाने केली.

Web Title :- Chakan Crime | pimpri chinchwad police seize Rs 18 lakh worth of gutka in 2 places

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pollution Certificate बाबत निष्काळजीपणा पडू शकतो महागात, ‘RC’ होईल सस्पेंड, जाणून घ्या मोदी सरकार काय करणार

Pune Corporation | भाडेतत्वावर नको आपणच खरेदी करू ई-व्हेईकल; शिवसेनेची भुमिका, वाहनचालकांना पाठींबा

Anti-Corruption | नगरपालिकेचे मुख्याधिकारी 28 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात