Chakan Firing Case | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार, चाकण परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Chakan Firing Case | खुनातील आरोपींना मदत केल्याच्या रागातून एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार केल्याची घटना सोमवारी (दि.18) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. हा प्रकार रासे येथील मराठा हॉटेल (Hotel Maratha Chakan) येथे घडली. याप्रकरणी स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे (रा. रासे) याने चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Police Records) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी राहुल पवार (रा. महाळुंगे ता. खेड), अजय गायकवाड (रा. म्हाळुंगे ता. खेड) व इतर दोन अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल करुन अजय गायकवाड याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यापूर्वी आरोपी राहुल पवार याचा लहान भाऊ रितेश पवार याचा खून झाला होता. खुनातील आरोपींना सोप्या शिंदे ह्याने मदत केल्याची माहिती आरोपींना मिळाली.

याच रागातून आरोपी सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मराठा हॉटेलमध्ये आले.
त्यांनी खुनातील आरोपींना मदत व सहकार्य केल्याच्या रागातून सोप्या शिंदे याच्यावर दोन गोळ्या झाडल्या.
या घटनेत फिर्यादी सोप्या शिंदे याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अजय गायकवाड याला ताब्यात घेतले.
घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक-2024 : शहरातील 85 जणांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

MNS Raj Thackeray-BJP Amit Shah | राज ठाकरे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत

Pune Koregaon Park Crime | सिगारेट घेण्यावरुन तरुणाला मारहाण, सहा जणांना अटक; कोरेगाव पार्क परिसरातील घटना