चाकण : तरुणाचा खुन करुन मृतदेह इंद्रायणीत बुडविला, देहुगावातील घटना, 2 दिवसांनी प्रकार उघडकीस

चाकण : तरुणाचा गळा दाबून त्याचा खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात घालून नदीत बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देहुगावातील इंद्रायणी घाटावर नदीपात्रात हा मृतदेह आढळून आला आहे.  याप्रकरणी चाकण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

इंद्रायणी नदीपात्रात एक पोते तरंगत असल्याने दिसून आले होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी ते पोते बाहेर काढले. त्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी त्याची तपासणी केल्यावर कोणीतरी तरुणाचा गळा बेल्टने आवळून त्याचा खुन केला व त्यानंतर त्याचे डोके सिमेंटच्या पोत्यामध्ये घालून त्यामध्ये ३ ते ४ किलो वजनाचा दगड घालून तरुणाचे हातपाय बांधून त्याला इंद्रायणी नदीपात्रातील पाण्यात टाकून दिले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like