Advt.

Chakan News : चाकणमध्ये अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन –  अल्पवयीन मुलीला गावाजवळच्या पडिक जागेत नेऊन तिचा गळा दाबून खून केला. ही घटना मंगळवारी (दि.8) दुपारी साडेतीनच्या सुमारास खेड तालुक्यातील गोनवडी येथे घडली.

माऊली (पूर्ण नाव माहीत नाही, वय 18, रा. नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मृत मुलीचे चुलते प्रवीण मोहन मोहिते (वय 35, रा. गोनवडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी माऊली याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन पुतणीला गोनवडी गावाजवळील बाळू बाबूराव मोहिते यांच्या पडिक जमिनीत नेले. या ठिकाणी मुलीचा गाळा दाबून खून केला. याबाबत मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. के. राठोड करीत आहेत.