Chakan News | कनेक्टरच्या सहाय्याने धोकादायकरित्या गॅस चोरी करणारे दोघेजण गजाआड, 34 लाखांचा मुद्देमाल जप्त

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – एचपी कंपनीच्या 15 टन कॅप्सूलमधून (HP Company’s 15 Ton Capsule) कनेक्टरच्या (connector) सहाय्याने धोकादायकरित्या गॅस चोरणाऱ्या (Gas theft) तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर दोन जणांना चाकण पोलिसांनी (Chakan Police) अटक (Arrest) केली आहे. चाकण पोलिसांनी (Chakan Police) त्यांच्याकडून 34 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 3) पहाटे पावणे पाचच्या सुमारास येलवडी गावच्या (Yelwadi village) हद्दीतील इंदोरी टोलनाक्याजवळ (Indori toll plaza) करण्यात आली. Chakan News | Two persons involved in dangerous gas theft with connector seized, Rs 34 lakh seized

गुरुदीप महलसिंग संधु Gurudeep Mahalsingh Sandhu (वय-31 रा. सुरा. ता. जलना. जि. अमृतसर, पंजाब), रमेश ठक्कराम मंजु Ramesh Thakkaram Manju (वय-21 रा. येलवडी ता. खेड, जि. पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस नाईक अजय मनमोहन गायकवाड (Police Naik Ajay Manmohan Gaikwad) (वय-32) यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे आरोपी येलवडी गावच्या(Yelwadi village) हद्दीतील इंदोरी टोलनाक्याजवळ (Indori toll plaza) एचपी कंपनीच्या 15 टन कॅप्सूल (एमएच 43 वाय 8865) (HP Company’s 15 Ton Capsule) मधून गॅस सिलेंडरच्या टाकीमध्ये कनेक्टरच्या सहाय्याने धोकादायकरित्या गॅसची चोरी करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई (Action) करुन दोन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून 34 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींविरोधात चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी (Sub-Inspector of Police Gosavi) हे करीत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Chakan News | Two persons involved in dangerous gas theft with connector seized, Rs 34 lakh seized

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘MPSC ला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायतत्ता म्हणजे स्वैराचार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात (Video)

Pune Crime News | मैत्रिणीला दारू पाजून 4 मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी केली मारहण, पुढं झालं असं काही…

Pune Crime News | पुण्यात तृतीयपंथीयाचा राडा, महिलेचे कपडे फाडून केली बेदम मारहाण