Chakan Pimpri Crime News | पिंपरी : चाकण बाजार समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांना मारहण करुन हप्ते मागणाऱ्या टोळीवर गुन्हा, दोन जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chakan Pimpri Crime News | चाकण बाजार समितीत (Krushi Utpanna Bazar Samiti Chakan) पाच ते सहा गावगुडांनी हप्त्याची मागणी करत दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. चाकण पोलिसांनी (Chakan Police) आरोपींना अटक केली मात्र, पहाटे त्यांना सोडून दिले. पोलिसांनी सोडून दिल्यानंतर गावगुंडांनी पुन्हा बाजार समिती परिसरात येऊन राडा घातला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी चारजणांवर गुन्हा दाखल करुन एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले आहे.(Chakan Pimpri Crime News)

याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, व्यापारी महेंद्र हरिभाऊ गोरे (वय-48 रा. चाकण-तळेगाव रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन राहुल उर्फ पिल्या बापु बचुटे (वय-21 रा. महात्मा फुले नगर, चाकण) याला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. रोहित उर्फ कान तुट्या अर्जुन वाघुदे, ओम ताकतोडे, आर्य़न उर्फ आरु प्रधान यांच्यावर आयपीसी 307, 387, 323, 504, 506, 141, 143, 147, 149 महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करुन हातात लकडी काठ्या, पीयुसी पाईप घेऊन दहशत माजवून लोकांना गाळे बंद करण्यास भाग पाडले. तसेच पिकअप गाडीवरील चालक भऊसाहेब गागरे यांची कॉलर पकडून तुम्ही माजले का? असे बोलून शिवीगाळ केली. तसेच मी रोहित अर्जुन वाघुदे आहे. मला ओळखत नाही का? असे म्हणून हातातील काचेची बाटली गागरे यांच्या कपाळावर, पाठीवर मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आमची कोणाकडे तकार केली तर तुला परत पहुन घेऊ, तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. तर गरुनाथ गावडे यांना देखील पीयुसी पाईपने मारहाण करुन त्यांच्याकडे हप्ता मागितला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे फडणवीस का नव्हते? अजित पवार म्हणाले…

Indapur Pune News | देशात उंच घोड्यामध्ये नावलौकिक असलेल्या ‘सिंकदर’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Excise Department Pune | पुणे : पोर्शे कार अपघातानंतर उत्पादन शुल्क विभागाला आली जाग, 68 हॉटेल व पबचे परवाने रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव