ADV

Chakan Pune Crime News | पोलिसांनी सोडताच गावगुंडांचा चाकण बाजार समितीत राडा, हप्त्याची मागणी करत शेतकरी व व्यापाऱ्यांना मारहाण

गावगुंडांचा बंदोबस्त करा अन्यथा बाजार समिती बंद ठेवण्याचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chakan Pune Crime News | चाकण बाजार समितीत (Chakan Krushi Bajar Samiti) पाच ते सहा गावगुडांनी हप्त्याची मागणी करत दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी शेतकरी, आडत व्यापाऱ्यांसह बाजार समिती संचालकांना गावगुंडांनी मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गावगुंडाचा बंदोबस्त करा, अन्यथा बाजार समिती बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी व आडते यांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण बाजार समितीत गावगुंडांनी दहशत माजवली. हप्त्याची मागणी करत मध्यरात्री गावगुंडांनी बाजार समितीत दहशत माजवली. तसेच आडत व्यापाऱ्यांना पाच ते सहा जणांकडून बेदम मारहाण झाल्याचे समोर आले आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.(Chakan Pune Crime News)

गावगुंडांनी रात्री बाजार समिती परिसरात येऊन शेतकऱ्यांना धमकावले होते. त्यानंतर चाकण पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
मात्र, पोलिसांनी पहाटे त्यांना सोडून दिले.
पोलिसांनी सोडून दिल्यानंतर गावगुंडांनी पुन्हा बाजार समिती परिसरात येऊन राडा घातला.
यावेळी दगड, कठी, कोयत्यांनी दहशत माजवत त्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांना मारहाण केली.
या घटनेमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुंडाच्या या दहशतीमुळे चाकण बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय आडते व व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तसेच गावगुंडाचा बंदोबस्त करा, अन्यथा बाजार समिती बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे शहरात विनापरवानगी अवजड वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करा, शरद पवार गटाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP | पुण्यातील दोन जागांवर अजित पवार गट आणि भाजपात जुंपली; निर्णयाकडे लक्ष

Sunetra Ajit Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांची नाराजी