चाकण हळू-हळू पूर्वपदावर, तणाव निवळला, महामार्ग वाहतुकीस खुला, संचारबंदी कायम 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणला पाठिंबा देण्यासाठी चाकण परिसरात पुकारलेल्या बंदला सोमवारी दुपारी हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने शेकडो वाहनांची तोडफोड केली तर १५ ते २० वाहने पेटवून दिली. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी व प्रवासी नागरिकही जखमी झाले. तब्बल सात तासानंतर चाकणमधील तणावाची परिस्थिती हळू हळू निवळत असून पुर्वपदावर येत आहे. मात्र चाकण परिसरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. कोल्हापुर परिक्षेत्र विभागाचे  विशेष पोलिस महानिरीक्षक  विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

[amazon_link asins=’B01FFIQFGY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’925e8101-940e-11e8-ab1e-6db1ca74a5bd’]

पुण्यात चाकण परिसरात आंदोलकांनी जबरदस्त तोडफोड केली आहे. शेकडो वाहने  आंदोलकांनी फोडली आहेत.  चाकण जवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली आहे. काही बसेस तर जळून खाक झाल्या आहेत. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलं आहे. चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुर नळकांड्याचा वापर करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B0756RFBLX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’35801bd1-9476-11e8-a6c4-21568fa9b08a’]

जमवाच्या दगडफेकित खेड डीवायएसपी राम पठारे, देहूरोड डीवायएसपी जी.एस. माडगूळकर, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पवार यांच्यासह चार कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या चाकणमधील तणाव हळू हळू कमी होत आहे.

जिल्ह्याधिकाऱ्यांनी परिसरात जमाव बंदीचे आदेश दिले आहेत.

कोल्हापुर परिक्षेत्र विभागाचे  विशेष पोलिस महानिरीक्षक  विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आंदोलकांशी चर्चा करुन शांत राहण्याचे आवाहन केले. या ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील, नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, मोठा पोलीस बंदोबस्त आहे. सध्या चाकणमध्ये तणावाचे वातावरण निवळत असून संचारबंदीचे आदेश कायम आहेत. पोलिसांनी महामार्गावरून वाहतूक सुरु केली आहे.