दसऱ्याला चक्का जाम आंदोलन : राजू शेट्टी

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन

विदर्भ आणि मराठवाडा मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपासून करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टींनी दुष्काळ परिषदेत दिली. सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत सरकारने द्यावी. त्यासोबतच दुष्काळ जाहीर करावा, तूर, हरभराचे रखडलेले पैसे द्यावे या मागण्यांसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc091922-c6c9-11e8-a569-c5891aa1e53c’]

सोयाबीन आणि कापूस हे विदर्भातील प्रमुख पिके आहेत. मागील काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे विदर्भातील शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे सोयाबीन, कापूस प्रश्नावर शासनाला जागे करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दुष्काळी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला खासदार राजू शेट्टी रविकांत तुपकर उपस्थित होते. सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी ५० हजार रुपये मदत सरकारने करावी, दुष्काळ जाहीर करावा, तूर, हरभरा चे रखडलेले पैसे द्यावे या मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्या आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d310318e-c6c9-11e8-85f2-893c57e9c921′]

नापीकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

लातूर :
चाकूर तालुक्यातील नांदगाव येथे खरीप हंगामातील नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. माधव कोलपके (४८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.माधव कोलपके यांनी खरीप हंगामात तब्बल ४ एकरामध्ये सोयाबीनचे पिक घेतले होते. याकरिता हजारो रुपये खर्च करूनही उत्पादन पदरी न पडल्याने त्यांना नैराश्य आले होते. शिवाय घरखर्चासाठी घेतलेल्या रकमेचीही परतअ‍ेड होत नव्हती. त्यामुळे त्यांनी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32b9549b-c6ca-11e8-a4dd-8f8f3d44e67d’]

हंगामाच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीनचे पिक जोमात होते. मात्र, गेल्या दोन महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनचा पाचोळा झाला होता. मुख्य पिकाचे निसर्गाच्या अवकृपेमुळे न भरून निघणारे नुकसान झाल्याने ते चिंताग्रस्त होते. हा ताण सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.