Chalisgaon Police Inspector KK Patil | नारदाच्या गादीवर बुटासहीत पाय ठेवणारे पोलीस निरीक्षक के. के. पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पोलीस ठाण्याच्या आवारात धरला डीजेवर ‘झिंगाट’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Chalisgaon Police Inspector KK Patil | कीर्तन सुरु असताना नारदाच्या गादीवर पाय ठेवल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चाळीसगाव शहराचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील (PI K.K. Patil) हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यावरुन सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर पाटील यांनी जाहीर माफी मागून या वादावर पडदा टाकला होता. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा के. के. पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात (Chalisgaon City Police Station) बर्थडे सेलिब्रेट करत पोलिसांनी (Chalisgaon Police) झिंगाट डान्स केला त्यावेळी पाटील यांनी देखील डीजेच्या (PI K. K. Patil Dance Video Viral) तालावर ठेका धरला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Chalisgaon Police Inspector KK Patil)

 

शुक्रवारी (दि.3) चाळीसगावचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील आणि पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा वाढदिवस (Birthday) होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या परिसरात केक कापण्यासह गाण्याच्या तालावर के. के. पाटील आणि कर्मचारी नाचताना दिसले. तसेच पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना खांद्यावर घेऊन नाचत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा नाचण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
तर नागरिकांमध्ये उलट, सुटल चर्चा होताना दिसत आहे.
या प्रकरणावर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Chalisgaon police inspector pi kk patil dance on dj song his birthday in chalisgaon police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा