मटका बुकी आणि नगरसेवक संजय तेलनाडेसह १२ जणांवर मोक्का

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – इचलकरंजीतील नगरसेवक आणि मटका बुकी संजय तेलनाडे, त्याचा भाऊ सुनील तेलनाडे यांच्यासह १२ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठवविला होता. त्याला विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी मंजूरी दिली.

संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, अड. पवन उपाध्ये, ऋषिकेश शिंदे, अऱविंद मस्के, राकेश कुंभार, दीपक कोरे, इम्रान कलावंत, राहूल चव्हाण, आरिफ कलावंत, अभिजीत जमादार, संदेश कापसे अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कलबं येथील मटक्यावरील कारवाईनंतर एसटी गॅंगचा म्होरक्या संजय तेलनाडे व मटकाकिंह राकेश अग्रवाल यांची नावे समोर आली होती. पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्य साथीदार असलेल्या जावेद दानवाडे,नूर सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

कळंबा येथील कारवाईनंतर संजय तेलनाडे पसार झाला होता. त्याच्यासह १८ जणांच्या टोळीवर मटका, दहशत पसरविणे, खंडणी, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर मटका चालक सलीम हिप्परगी याच्या खून प्रकरणात तेलनाडे हा संशयित आहे. या खटल्यातून त्याची निर्दोष मुक्ततात तर झाली.

परंतु भरत त्यागी खून प्रकरणात त्याला अटक केली. त्या प्रकरणात तो जामीनावर बाहेर आहे. मात्र कळंबा येथे मटका कारवाई केल्यानंतर तो पसार झाल. तर शहापूर खंडणी मागितल्याप्रकरणी त्याचा भाऊ सुनील तेलनाडे, वकिल पवनकुमार उपाध्ये, ह्रषिकेश लोंढे, अरविंद म्हस्के, राकेश कुंभार, दीपक कोरे, इम्रान कलावंत, राहूल चव्हाण, अरिफ कलावंत, अभिजीत जामदार, संदेश कापसे, दिंगवर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

दरम्यान एसटी गॅंगची परिसरात वाढणारी दहशत आणि त्यांच्यावर दाखल गंभीर गुन्ह्यांमुळे एसटी गॅंगवर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशाने तयार करण्यात आला. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी त्याला आज मंजूरी दिली.