home page top 1

‘या’ एका अफवेमुळे दिल्लीतील टॅक्सीचालक घेऊन फिरत आहेत ‘कंडोम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील टॅक्सी चालक आपल्याबरोबर कंडोम घेऊन फिरत आहेत. याविषयी त्यांना विचारले असता ते सांगत आहेत कि, जर आम्ही हे बरोबर नाही ठेवले तर आम्हाला मोठा दंड होऊ शकतो. मात्र यामागील कारण देखील जबरदस्त आहे.

दक्षिण दिल्लीतील टॅक्सी चालक धर्मेंद्र याला पोलिसांनी पकडले असता त्याच्या गाडीतील प्रथमोपचाराचे बॉक्स तपासले.  पोलिसांना यामध्ये कंडोम आढळून आल्याने त्यांनी त्याला दंड केला. मात्र त्याने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी गाडीत कंडोम नाही म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे त्याने आपल्या या प्रथमोपचार पेटीत कंडोम ठेवण्यास  सुरुवात केली.

मात्र त्याला देण्यात आलेल्या पावतीवर अतिवेग असे कारण देण्यात आले आहे. मात्र आता यानंतर दिल्लीत यासंबंधी मोठी अफवा पसरली असून सर्व टॅक्सी ड्राइवर त्यांच्या गाडीत कंडोम ठेवत आहेत. जर आमच्या गाडीत कंडोम नसेल तर आम्हाला मोठा दंड होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.  त्याचबरोबर काही जणांनी सांगितले कि, त्यांना पोलिसांनी कोणत्याही प्रकारे असा प्रश्न विचारला नाही.

दरम्यान, सर्वोदय ड्रायवर असोसिएशनचे अध्यक्ष कमलजीत गिल यांनी याविषयी सांगितले कि, कंडोमचा वापर अनेक संकटात होत असतो. कुणाला जखम झाल्यास तेथील रक्तस्त्राव थांबवण्यास देखील याची मदत होते. त्यामुळे प्रत्येकाकडे तीन कंडोम असावे असे त्यांचे म्हणणे आहे.

visit : Policenama.com 

Loading...
You might also like