home page top 1

पोलीस हवालदाराने सांगितली ‘आयडिया’, फक्त १०० रुपयांमध्ये असे रद्द करा चलन (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात १ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चलन कापले जात आहेत. बर्‍याच वेळा चलनातील दंडाची रक्कम इतकी असते की लोक चकित होतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आता दंडाचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे.

विशेष म्हणजे स्वत: पोलिसांचे चलन देखील मोठ्या प्रमाणावर कापले जात आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिसांना कडक संदेश देण्यासाठी अहमदाबाद पोलिस आणि चंदीगड पोलिसांनी हे चलन कापले आहेत.

दरम्यान, हरियाणा पोलिस हवालदाराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सांगितले जात आहे की चलन भरल्यानंतर अधिक पैसे देणे टाळून फक्त शंभर रुपये देऊन पैसे कशी सुटका मिळू शकते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

खरं तर हरियाणाचे पोलिस हवालदार सुनील संधू यांनी फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओमध्ये सांगितले की, जागरूकता नसल्यामुळे लोक चलनासाठी जास्त पैसे मोजत आहेत. सुनील सांगतात की, चलन कापल्यानंतर आपण फक्त १५ दिवसांच्या आत आरटीओ कार्यालयात जाऊन तिथे आपली सर्व कागदपत्रे दाखवू शकतो. यानंतर कागदपत्र न नेल्याबद्दल प्रति कागदपत्र केवळ १०० रुपये दंड आकारला जाईल.

सुनील म्हणाले की बर्‍याच वेळा लोकांकडे कागदपत्रे असतात, परंतु घटनास्थळावर न दाखविल्यामुळे चलन कापण्यात येते. म्हणून, जर तेथे जागेवर कोणतीही कागदपत्रे नसतील तर आपण नंतर प्रत्येक कागदपत्राला १०० रुपये देऊन दंड क्लीअर करू शकता. तथापि, जर आपण हेल्मेटशिवाय वाहन चालवत असाल तर दंड वेगळा असेल.

कोण आहेत सुनील संधू :
मिळालेल्या माहितीनुसार सुनील संधू हे सध्या कैथल येथे हवालदार पदावर कार्यरत आहेत. ते बऱ्याचदा सामाजिक कार्यातही भाग घेतात. सुनीलच्या या कृतीमुळे प्रभावित होऊन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्यांचा अनेकदा गौरव केला आहे. सुनील लोकांना मदतही करतात. त्यांनी आतापर्यंत सुमारे सात हजार झाडे लावली आहेत. त्याचबरोबर झोपडपट्टीत राहणाऱ्यांना मोफत कपडे वाटप करतात. इतकेच नव्हे तर विटभट्ट्यावर काम करणाऱ्या मुलीच्या डोळ्याचे ऑपरेशनही सुनील यांनी स्वखर्चातून केले.

Visit : policenama.com

Loading...
You might also like