दोषपूर्ण ईव्हीएमवरुन राज्यातील ७ खासदारांच्या निवडीला ‘आव्हान’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या मतदानात दोषपूर्ण ईव्हीएम वापरले तसेच प्रत्यक्ष मतदान आणि मोजण्यात आलेले मतदान यात तफावत असल्याचा आरोप करीत विदर्भातील ७ खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्चन्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या खासदारांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी, अशोक नेते, सुनील मेंढे, रामदास तडस, शिवसेनेचे कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव व काँग्रेसचे बाळू धानोरकर यांचा समावेश आहे.

गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर डबरासे यांच्यासह एकूण तिघांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी तुमाने यांच्या निवडणुकीला तर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे, कारू नान्हे, बळीराम सिरसकर, अ‍ॅड. राजेंद्र महाडोले व धनराज वंजारी यांनी इतर खासदारांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे.

निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच, निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

 

Loading...
You might also like