फक्त 9 रूपये खिशात असणारा व्यक्ती केजरीवालांच्या विरूध्द निवडणूकीच्या रिंगणात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. प्रत्येक पक्ष विरोधकांना टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार उभा करण्याच्या प्रयत्नात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टक्कर देण्यासाठी राजकारणातील अनुभवी व्यक्ती तयार आहेत. यातच श्री वेंकटेश्वर महाराज स्वामी यांनीही केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना दीपक या नावाने देखील ओळखले जाते.स्वामींनी आत्तापर्यंत 16 निवडणुका लढवल्या आहेत. यामध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील आहे.

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील स्वामींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी एकूण तीन नामांकन अर्ज भरले आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हिंदुस्तान जनता पार्टीकडून अर्ज दाखल केले आहेत. तसेच त्यांनी 10 हजार रुपये सिक्युरिटी जमा केली आहे. स्वामी सध्या द्वारकामध्ये आपल्या एका मित्रासोबत राहत आहेत. दिल्लीत राहण्यासाठी कोणतेही ठिकाण नसल्याने ते मित्रासोबत राहत आहेत. त्यांचा मित्र बांधकाम मजूर असल्याचे स्वामी सांगतात.

स्वामीनी नामांकन भरताना आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्याकडे फक्त 9 रुपये कॅश असल्याचे म्हटलं आहे. तर आपले मित्र शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नाही) यांच्याकडून 99 हजार 999 रुपये उधार घेतले आहेत. याविषयी बोलताना स्वामी म्हणाले, मी आत्तापर्यंत समाजाची सेवा निस्वार्थ भावनेने केली आहे. आता दिल्लीत काम करण्याची इच्छा आहे. जर भाजपला वाटत असेल की मी योग्य उमेदवार होऊ शकतो तर पार्टी माझे समर्थन करेल. भाजपने तिकीट दिले नाही तर उर्वरीत दोन पक्षांमधून कोणीतरी तिकीट आवश्य देईल, त्यामुळे तीन पक्षांकडून नामांकन अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/