सुशांत सिंगच्या ‘या’ चित्रपटा विरोधात नोटीस, प्रदर्शनापूर्वीच सापडला वादात  

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मुख्य भूमिका असलेला ‘सोन चिरैय्या’ चित्रपट प्रदर्शनापूर्वी वादात सापडला आहे. चंबळच्या लोकांनी या चित्रपटाला विरोध केला असून याप्रकरणी निर्माता आणि दिग्दर्शकाला नोटीस बजावण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र या चित्रपटातून चंबळची प्रतिमा मलीन करण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तसेच चित्रपटाच्या प्रचारादरम्यान ‘चंबळ टुरिज्म’ या शब्दाचा वापर करून दरोडेखोर, बंदूक, हिंसा, अपहरण दाखवण्यात आले आहे, यावरही लोकांनी आक्षेप घेतला आहे.

या चित्रपटाची कथा चंबळच्या दरोडेखोरांच्या आयुष्यवर आधारित आहे. आणीबाणीनंतर चंबळमधील दरोडेखोऱ्याचं आयुष्य कसं पूर्णपणे बदलते यावर चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, भूमी पेडणेकर, अशुतोष राणा, मनोज वाजपेयीमुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या १ मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे.