वेगळं शहर वसवतोय 568 कोटींचा मालक आणि ‘छम्मक छल्लो’चा सिंगर ! असणार त्याचं ‘चलन’ अन् ‘नियम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याला अभिनेता शाहरुख खान आणि करीना कपूर यांचा चित्रपट रा.वन आणि त्या चित्रपटाचे ‘छम्मक छल्लो’ हे गाणे आठवतच असेल. हा ! ज्या गाण्यात करीना कपूरने रेड कलरची साडी परिधान केली होती आणि ते गाणेही खूप गाजले होते. हे गाणं गाण्याच्या गायकामुळं खास गाजलं होतं. आता या गाण्याचा सिंगर एकॉन एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सिंगर आणि रॅपर एकॉन स्वतःच वेगळं शहरच वसवणार आहे. या शहराला त्यानं एकॉन सिटी असे नाव दिले आहे.

या गाण्याला आवाज देणारा रॅपर एकॉन आता दक्षिण आफ्रिकेत स्वत:चं एक स्वतंत्र शहर तयार करणार आहे. स्वत: गायक एकॉनने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे आणि म्हटले आहे की ‘एकॉन सिटी’ चा करार पूर्ण झाला आहे. वृत्तानुसार, एकॉन सिटी सेनेगलमध्ये स्थायिक आहे

कोण आहे एकॉन ?
एकॉन एकप्रसिद्ध अमेरिकन गायक गीतकार आणि रॅपर आहे. सर्वात प्रसिद्ध गायकांपैकी एकॉन एक आहे. त्याचं पूर्ण नाव ऑलिऑन बदारा एकॉन थियम असे आहे. 2004 मध्ये त्याचा पहिल्या अल्बमचे पहिले गाणे “लॉक अप” रिलीज झाल्यानंतर तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. त्याला कॉन्व्हिक्टेड हा दुसरा अल्बम मधील “स्मॅक थॅट” या गाण्यासाठी ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/