चामोलीत सुरू असलेल्या शोधमोहिमेत आढळले 12 मृतदेह; मृतदेहांची एकूण संख्या झाली 50

पोलिसनामा ऑनलाईन, चमोली : उत्तराखंडच्या चामोली येथे पूर्वी ग्लेशियर फुटल्यामुळे झालेल्या विध्वंसानंतर शोध आणि बचावकार्य सुरू आहे. रविवारी 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले. यांसह, मृतदेहांची संख्या आता 50 झाली आहे.

याबाबत चामोलीची डीएम स्वाती भदौरिया यांनी सांगितले की, बोगद्यात बचावकार्य अधिक तीव्र केले जाईल. तथापि, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 14 ते 16 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण भागात हवामान खराब होईल. पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे, अशा परिस्थितीत बचाव पथकाची समस्या वाढू शकते.

तर, उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, 7 फेब्रुवारीपासून तपोवन बोगद्यात बचावकार्य सुरू आहे. रविवारी बोगद्यातून 2 मृतदेह बाहेर काढले आहेत. उत्तराखंड पोलिस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. एनडीआरएफ आता बोगद्यातील लोकांना कॅमेर्‍याद्वारे शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

ॠषीगंगा अप्पर स्ट्रीम लेककडून धोका नाही
याबाबत डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, आपत्तीनंतर ॠषीगंगाच्या वरच्या प्रवाहात बांधलेल्या तलावापासून सध्या कोणताही धोका नाही. या तलावामधून सतत गळती होत आहे. या तलावाच्या अस्तित्वामुळे धोक्याची शक्यता वर्तविली होती. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकाने याचा तपास केलाय. या पथकाने तलावाच्या स्थलीय तपासणीनंतर तलावाचा सविस्तर अहवाल तयार केला आहे आणि तो अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविला आहे.

तलावाशेजारी असेल चेतावणी देणारे स्वयंचलित गजर यंत्र
तलावावर चेतावणी देणारे स्वयंचलित अलार्म सिस्टम बसविण्याचेही डीजीपीने म्हटले आहे. जेव्हा तलावापासून मोठा धोका होईल, तेव्हा ही यंत्रणा वापरात येईल. तेव्हा ही यंत्रणा स्वयंचलितपणे गजर देऊन लोकांना सतर्क करेल. पेंग गाव, रैनी आणि तपोवन येथे ही यंत्रणा बसविली जाणार आहे.

याबाबत डीजीपी अशोक कुमार म्हणतात की, जोपर्यंत अलार्म सिस्टम लागत नाही तोपर्यंत एसडीआरएफची टीम काम केल. तसेच पथक तिन्ही गावात राहील.