×
Homeताज्या बातम्याChampa singh Thapa | बाळासाहेबांच्या 'सावली'नेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ, 'मातोश्रीचा सेवक'...

Champa singh Thapa | बाळासाहेबांच्या ‘सावली’नेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ, ‘मातोश्रीचा सेवक’ शिंदे गटात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोरी (Rebellion) केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार (MLA), खासदार (MP), पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात (Shinde Group) सामील झाले आहेत. त्यांनंतर आता बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची सावली आणि मातोश्रीचा सच्चा सेवक म्हणून ओळख असलेल्या चंपासिंग थापा (Champa singh Thapa) यांनी देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली आहे. चंपासिंग थापा (Champa singh Thapa) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. थापा हे बाळासाहेबांचे सर्वात विश्वासू अशी त्यांची ओळख आहे.

ठाकरे कुटुंबाला मोठा धक्का

चंपासिंग थापा (Champa singh Thapa) यांनी शिंदे गटात जाणे हे राजकीयदृष्ट्या धक्कादायक नसले तरी ठाकरे कुटुंबासाठी (Thackeray Family) हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. चंपासिंग थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला एक भावनिक किनार आहे कारण थापाला बाळासाहेबांची सावली म्हटले जात होते. बाळासाहेब ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभांसाठी जात त्या ठिकाणी थापा हे बाळासाहेबांच्या पाठिशी सावली प्रमाणे उभे असायचे.

कोण आहेत चंपासिंग थापा?

चंपासिंग थापा 30 वर्षापूर्वी नेपाळहून (Nepal) भारतात आले. मुंबईच्या गोरेगावमध्ये राहून त्यांनी पोटापाण्यासाठी छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली. भांडूपचे नगरसेवक के.टी. थापा (K.T. Thapa) यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना मातोश्रीवर (Matoshree) प्रवेश मिळाला आणि काही काळातच थापा बाळासाहेबांचा लाडका झाला.

बाळासाहेब ठाकरे यांचं जेवण, औषधांच्या वेळा यासारख्या रोजच्या गोष्टींवर थापा लक्ष ठेवून असायचा.
मांसाहेब मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांच्या निधनानंतर बाळासाहेब आणखीनच हळवे झाले होते.
तेव्हा थापाने बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेतली.

मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोली शेजारी थापाची खोली होती.
थापाचं कुटुंब नेपाळमध्ये तर दोन मुलं दुबईमध्ये असतात.
मुंबईसह महाराष्ट्रात झालेली शिवसेनेची वाढ, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नारायण राणे
(Narayan Rane) यांनी केलेलं बंड तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोडलेली साथ,
या सगळ्या काळात थापा बाळासाहेबांच्या कायमच जवळ राहिले.

Web Title :- Champa singh Thapa | another set back for uddhav thackeray balasaheb thackeray close person champasingh thapa joins shinde Group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | लॉन्ड्री चालकाचा खून करुन मृतदेह फेकला डेक्कन परिसरातील नदीपात्रात, प्रचंड खळबळ

Fiber Rich Foods | जपानी लोकांसारखे दिर्घायुष्य हवे असेल तर खाण्यास सुरुवात करा ‘हे’ 6 सुपरफूड

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News