Chanakya Neeti : नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या बेतात असाल तर ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा, अन्यथा…

चाणक्य शिक्षक होते शिवाय राजकारण, कूटनिती, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रातील तज्ज्ञ होते. आचार्य चाणक्यांची चाणक्य निती व्यक्तीला नेहमी चांगले कार्य करण्यास प्रेरणा देते. याच कारणामुळे चाणक्यांच्या चाणक्य नितीचे आजचही तेवढेच महत्व आहे.

चाणक्य म्हणतात कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी व्यक्तीने आपल्या क्षमता आणि साधनांचा विचार केला पाहिजे. जोपर्यंत व्यक्ती याकडे दुर्लक्ष करेल, यश त्याच्यापासून दूर राहिल. यासाठी या गोष्टी जरूर लक्षात ठेवा…

कार्य योजना तयार करा
कोणतेही कार्य करण्यासाठी सर्वप्रथम त्याची योजना तयार करा. जसे की हे कार्य पूर्ण करण्यासाठी कोण-कोणत्या गोष्टींची गरज भासणार आहे. या गोष्टींची पूर्तता कशी होईल, इत्यादी. जेव्हा कोणत्याही कार्याची योजना होते, तेव्हा ती पूर्ण करणे सोपे जाते. बिझनेसच्या बाबतीत सुद्धा हे लागू होते.

कठोर मेहनतीतून मिळते यश
यश सहज मिळत नाही, यासाठी व्यक्तीला कठोर मेहनत करावी लागते आणि मेहतीला कोणताही पर्याय नसतो. यासाठी जेव्हा नवीन कार्यारंभ कराल तेव्हा कठोर मेहनतीसाठी तयार राहा. मेहनतीमध्येच यशाचे रहस्य लपलेले असते.

योग्य सहकार्‍यांना सोबत घ्या
व्यापारात यश मिळवण्यासाठी, सर्वप्रथम योग्य सहकार्‍यांचा शोध घ्या. कारण कोणतेही मोठे काम एकट्याने पार पाडता येत नाही. यामध्ये अनेक लोकांचे श्रम आणि सहकार्य सहभागी असतात. यासाठी तुमच्याकडे जेवढे कुशल, योग्य आणि परिश्रम करणारे सहकारी असतील, यश तेवढेच जवळ असेल.

चाणक्य नितीचा हा श्लोक समजून घ्या
को काल: कानि मित्राणि को देश: कौ व्ययागमौ।
कोवाहं का च मे शक्ति: इति चिन्त्यं मुहुर्मुह:॥

कोणतेही कार्य करण्यापूर्वी चाणक्यांच्या हा श्लोक समजून घेतला पाहिजे. या श्लोकाचा अर्थ आहे –

कोणतेही कार्य करण्यापूर्वी वेळ आणि स्थळाचा विचार केला पाहिजे, यानंतर हे समजून घेतले पाहिजे की, आपल्याला सहकार्य करणारे कोण आहेत आणि संसाधने कोणत्या प्रकारची आहेत आणि स्वत:ची पात्रता कोणत्या प्रकारची आहे. जर या गोष्टी समजून घेतल्या तर कोणतेही नवीन कार्य करताना अपयश येणार नाही.