चाणक्य नीती : कधीही श्रीमंत होऊ शकत नाहीत ‘या’ 6 प्रकारचे लोक, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथात मनुष्यासाठी अनेक नीतींचा उल्लेख केला असून त्या अनुसरून आयुष्य सुखी होते. ते एका श्लोकाच्या माध्यमातून अशा लोकांबद्दल सांगतात जे कधीही धनवान होऊ शकणार नाहीत. या जाणून घेऊया अशा ६ प्रकारच्या लोकांबद्दल…

कुचैलिनं दन्तमलोपधारिणं बह्वाशिनं निष्ठुरभाषिणं च।

सूर्योदये चास्तमिते शयानं विमुञ्चतिश्रीर्यदि चक्रपाणि:।।

गलिच्छ कपडे घातलेल्या व्यक्तीकडे लक्ष्मी कधीही येत नाही. जे लोक नेहमी घाणीत राहतात, आजूबाजूला स्वच्छता ठेवत नाहीत, त्यांच्यावर धनलक्ष्मीची कृपा होत नाही. तसेच समाजाला देखील ते आवडत नाही आणि त्यांना सगळीकडून अपमान सहन करावा लागतो.

 

या श्लोकात चाणक्य असे म्हणतात की, जो माणूस दात स्वच्छ ठेवत नाही त्यांना गरीबीचा सामना करावा लागतो. लक्ष्मी त्यांचा त्याग करते. तसेच नियमितपणे दात साफ करणार्‍यावर लक्ष्मीची कृपा असते.
चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, भूकेपेक्षा जास्त खाणारा माणूस कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. दरिद्री माणसाला गरिबीकडे नेते. तसेच एखादी व्यक्ती जास्त अन्न खाल्ल्यास कधीही स्वस्थ राहत नाही.

जे लोक कडू बोलतात ते कधीही श्रीमंत होऊ शकत नाहीत. चाणक्य असे म्हणतात की वाणीमुळे इतरांच्या मनाला दुखावणाऱ्या लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होत नाही आणि त्यांचा मित्र बनण्यासही ती सक्षम नसते. अशी लोक शत्रूंनी वेढलेली असतात.

सकाळ ते संध्याकाळपर्यंत झोपणारे लोकसुद्धा कधी श्रीमंत होऊ शकत नाहीत. चाणक्य म्हणतात की, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत झोपलेल्या व्यक्तीला लक्ष्मी प्रसन्न होत नाही. विनाकारण झोपणे माणसासाठी हानिकारक असते. अन्याय, धूर्तता किंवा बेईमानीतून पैसे कमावणारे लोक जास्त दिवस श्रीमंत राहू शकत नाहीत. ते लवकरच आपले धन गमावून बसतात.