Chanakya Niti : चाणक्य यांच्यानुसार मुलांना योग्य बनवतात ‘या’ गोष्टी, आई-वडीलांनी दिले पाहिजे लक्ष, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Chanakya Niti Marathi – चाणक्य हे एक महान विद्वान होतेच शिवाय एक उत्तम शिक्षक सुद्धा होते. चाणक्य यांचा संबंध त्यांच्याकाळातील जागतिक दर्जाच्या तक्षशिला विद्यापीठाशी होता. चाणक्य यांनी तक्षशिला विद्यापीठात शिक्षण प्राप्त केले होते आणि नंतर ते याच विद्यापीठात आचार्य म्हणून नियुक्त झाले. येथे त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे कार्य केले. चाणक्य स्वत: एक योग्य आचार्य होते आणि त्यांच्या जीवनाचा एक मोठा भाग विद्यार्थ्यांना शिकवण्यात व्यतीत झाला, यासाठी त्यांना विद्यार्थी जीवनाचा चांगला अनुभव होता.

चाणक्य यांचे मत होते की, कोणत्याही आई-वडीलांना सर्वात मोठी संधी योग्य संतती प्राप्तीची असते. संतती चांगली व्हावी आणि जीवनात श्रेष्ठ कार्य करावे, अशी इच्छा प्रत्येक पालकांमध्ये असते. परंतु, ही इच्छा सर्वांचीच पूर्ण होत नाही. संततीला योग्य बनवण्यासाठी काही नियमांचे पालक करावे लागते आणि अनेक प्रकारच्य सुखांचा त्याग करावा लागतो. संतती चांगली घडवायची असेल तर काही गोष्टींकडे लक्ष ठेवले पाहिजे.

संस्कारांची माहिती द्या
चाणक्य यांच्यानुसार, शिक्षणाचे महत्व तेव्हाच आहे जेव्हा विद्यार्थ्यांना संस्कारांबाबत पूर्ण ज्ञान असेल. कुटुंब आणि आई-वडील एकप्रकारे संततीसाठी पहिला शाळा असतात. मुले आपल्या जीवनात आई-वडीलांच्या सवयीतून खुपकाही शिकतात. मुले आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमधून जास्त शिकतात. यासाठी आई-वडीलांनी मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत. संस्कार युक्त संततीच श्रेष्ठ बनते.

मुलांसमोर करू नका चुकीचे वर्तन
चाणक्य यांच्यानुसार, मुलांवर घरातील वातावरणाचा खुप परिणाम होतो. आई-वडील जेव्हा मुलांसमोर चुकीचे वागतात तेव्हा त्याचा खुपच वाईट परिणाम मुलांच्या मनावर आणि मेंदूवर पडतो. यासाठी मुलांसमोर आई-वडीलांनी सदैव चांगले वर्तन केले पाहिजे.

चांगल्या सवयी अंगीकारा
चाणक्य यांच्यानुसार आई-वडीलांनी स्वत: चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. जेव्हा आई-वडील चांगल्या सवयींचे अनुकरण करतील तेव्हा संतती सुद्धा त्या सवयी अगीकारते. घरातील वातावरण दुषित होऊ देऊ नका.