Chanakya Niti : ‘या’ 2 सवयींमुळं व्यक्तीला सर्वाधिक नुकसान सहन करावं लागतं, वेळेपुर्वीच करा दूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    चाणक्य एक महान विद्वान होते. चाणक्य यांना अनेक विषयांची माहिती होती. चाणक्य जितके चांगले शिक्षक होते, ते अर्थशास्त्रज्ञही होते. त्याशिवाय चाणक्य कुशल रणनीतिकारही होते. चाणक्य यांनी समाज आणि माणसांना प्रभावित करणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या जोरावर चाणक्य यांना जे काही माहित आणि समजत असे त्यांना ते धोरणात स्थान देत असे.

चाणक्य यांचा असा विश्वास होता की, एखाद्याने नेहमी चांगल्या सवयी लावाव्यात. चांगल्या सवयी माणसाला महान आणि यशस्वी बनवतात. चांगल्या सवयींचा विकास शिक्षण आणि संस्कृतीतून होतो. चाणक्यच्या मते जेव्हा एखाद्या व्यक्तीला चुकीची सवय असते तेव्हा त्याची प्रगती थांबते. अशा लोकांना समाजात आणि कामाच्या ठिकाणी आदर मिळत नाही. चाणक्यानुसार या दोन सवयींपासून नेहमी दूर रहावे.

खोटे बोलणे ही सर्वात वाईट सवय

चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने नेहमी खोट्या गोष्टीपासून दूर रहावे. खोटे बोलण्याची सवय सर्वात वाईट आणि सर्वात धोकादायक आहे. ज्या व्यक्तीला खोटे बोलण्याची सवय लागते, तो केवळ स्वत: चेच नुकसान करतो असे नाही. जेव्हा अशा व्यक्तीचे वास्तव समोर येते तेव्हा प्रत्येकजण त्याच्यापासून दूर होतो.

एखाद्या व्यक्तीच्या यशामध्ये आळस हा सर्वात मोठा अडथळा आहे

चाणक्यच्या मते आळशीपणा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या यशामध्ये सर्वात मोठा अडथळा असतो. एखाद्याने नेहमी आळशीपणापासून दूर रहावे. आळशी माणूस जीवनातल्या अनेक संधी गमावतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पुन्हा पुन्हा संधी उपलब्ध नसतात. जे संधींचा फायदा घेऊ शकत नाहीत त्यांना यश कधी मिळत नाही. आळशी व्यक्ती कधीही संधींचा फायदा घेण्यास सक्षम नसतो आणि शेवटी त्याला निराश व्हावे लागते. जी व्यक्ती नेहमीच सावध अवस्थेत असते आणि संधींचा फायदा घेण्यासाठी नेहमीच तयार असते, जीवनात मोठे यश संपादन करते.