Chanakya Niti : ‘हे’ कराल तर सर्वच होतील तुमचे Fan ! जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्र ग्रंथात जीवनातील समस्यांवर तोडगा काढला आहे, त्याचबरोबर जीवनाशी संबंधित मूल्यांवर बारकाईने चर्चा केली आहे. त्याच वेळी, आचार्य चाणक्य यांनी अनेक श्लोकांचे वर्णन करुन सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीने गोड बोलण्यासोबतच सत्य बोलले पाहिजे. याव्यतिरिक्त, त्यांनी असेही सांगितले आहे की, कोणती कामे करून एखादी व्यक्ती जगावर नियंत्रण ठेवू शकते.

यदीच्छसि वशीकर्तुं जगदेकेन कर्मणा ।
परापवादसस्येभ्यः गां चरन्तीं निवारय ॥

या श्लोकात आचार्य चाणक्य असे म्हणतात की, जर तुम्हाला संपूर्ण जगाला वशमध्ये करायचे असेल किंवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे बनवायचे असेल तर वाईट करण्याची सवय सोडून द्यावी लागेल. चाणक्य म्हणतात की, ते सोडल्यास प्रत्येकजण आपल्याला आवडू लागतो आणि मग ते आपल्या ग्रोथसाठी योग्य आहे. चाणक्य म्हणतात की, जगावर नियंत्रण ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपण कोणालाही वाईट बोलू नये. जेव्हा जेव्हा आपण हे करण्याचा विचार कराल तेव्हा ते थांबवा. यापेक्षा कोणताही चांगला मार्ग नाही.

तावन्मौनेन नीयन्ते कोकिलश्चैव वासराः ।
यावत्सर्वं जनानन्ददायिनी वाङ्न प्रवर्तते॥

आचार्य चाणक्य यांनी या श्लोकातील शब्दाचे महत्त्व विशद केले आहे. चाणक्य म्हणतात की, वसंत ऋतू येईपर्यंत कोकिळा ज्या प्रकारे गप्प बसते. वसंत ऋतू येतो तेव्हाच तिच्या गोड आवाजाने ती प्रत्येक व्यक्तीचे लक्ष वेधून घेते, त्याच प्रकारे एखाद्या व्यक्तीने नेहमीच गोड बोलावे. जर आपण गोड बोलू शकत नाही तर शांत रहाणे चांगले.

लुब्धमर्थेन गृह्णीयात् स्तब्धमंजलिकर्मणा।
मूर्खं छन्दानुवृत्त्या च यथार्थत्वेन पण्डितम्।।

आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात असे म्हटले आहे की, पैसे देऊन एखाद्या लोभी व्यक्तीला वशमध्ये केले जाऊ शकते, परंतु जर एखाद्या विद्वान किंवा ज्ञानी व्यक्तीला वशमध्ये करायचे असेल तर केवळ त्यांच्या समोर सत्य बोलले पाहिजे. जर एखाद्या मूर्ख माणसाला स्वत:च्या वशमध्ये करायचे असेल तर तो जसे-जसे बोलेल तसे आपल्याला केले पाहिजे. चाणक्य म्हणतात की, मूर्ख लोक खोटी प्रशंसा करुन प्रसन्न होतात. अहंकारी आणि गर्विष्ठ लोकांना हात जोडून किंवा त्यांना योग्य आदर देऊन आपल्या वशमध्ये केले पाहिजे.