Chanakya Niti : ‘या’ 7 लोकांना कामाच्या दरम्यान झोप आल्यास त्वरित उठवावे, अन्यथा होईल मोठे नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नीतिशास्त्राचे महान जाणकार आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अर्थशास्त्र, राजकारण आणि मानवी जीवनाशी संबंधित सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. त्यांची धोरणे आजही लोकप्रिय आहेत. ज्याचा अवलंब करून एखादी व्यक्ती कठीण काळातही संकटांचा सामना करू शकते. या चाणक्य नीतिमध्ये त्यांनी एका श्लोकाद्वारे सांगितले आहे की, कोणत्या लोकांना झोपेतून त्वरित उठविले पाहिजे…

विद्यार्थी सेवक: पान्थ: क्षुधार्तो भयकातर:।
भण्डारी प्रतिहारी च सप्त सुप्तान् प्रबोधयेत् ।।

विद्यार्थी, नोकरदार, पादचारी, प्रवासी, भुकेने पीडित, घाबरलेला व्यक्ती आणि स्टोअर गार्ड जर त्यांच्या कामाच्या वेळी झोपेत असल्यास त्यांना जागे केले पाहिजे. चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, जर विद्यार्थी झोपलेला असेल तर तो अभ्यास कसा करेल. जर मालकाने नोकराला झोपलेले पहिले तर तो त्याला नोकरीवरून काढून टाकेल. अशा वेळी त्याला खूप संकटाचा सामना करावा लागू शकतो.

आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रवासी प्रवासात झोपला तर त्याच्यासोबत कोणतीही घटना घडू शकते. त्याचे सामान चोरीला जाऊ शकते. त्याची हत्या देखील होऊ शकते. तसेच, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात भूक किंवा तहान लागली असेल तर, त्याला जागृत करणे हे त्याच्या समस्येचे निराकरण आहे. स्वप्नात घाबरलेल्या व्यक्तीलाही हेच लागू होते. जर स्टोअरचा गार्ड झोपलेला असेल तर त्यांना उठविणे चांगले आहे, कारण त्यांच्या झोपेमुळे त्यांच्याबरोबर इतरांचेही नुकसान होऊ शकते. आचार्य यांचे हे विधान शास्त्राच्या या आदेशांशी जोडले गेले पाहिजे, ज्यामध्ये म्हटले की, कोणत्या झोपी गेलेल्या माणसाला उठवू नये. झोप ही शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची स्थिती आहे जी जीवनास संतुलित प्रणाली देते. या संदर्भात प्राणी व झाडांना झोपेतून उठवू नये आणि रात्री त्यांना स्पर्श करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.