Chanakya Niti : संकट आल्यावर ‘या’ तीन गोष्टी कधीही नका विसरू

पोलिसनामा ऑनलाईन – चाणक्यची चाणक्य नीती आजही लोकप्रिय आहे. चाणक्य नीती आजही खूप लोक वाचतात आणि चाणक्यच्या शिकवणींना आयुष्यात लागू करण्याचा प्रयत्न करतात.

चाणक्य नीती व्यक्तीला योग्य मार्ग दाखवते. सुख आणि दुःखात व्यक्तीचे वागणे कसे असावे याबाबत सांगते. चाणक्यने आपल्या चाणक्य नीतीमध्ये व्यक्तीला संकटातून बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून त्याबद्दल…

चाणक्यच्या म्हणण्यानुसार, जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिला संकट आणि अडचणींचा सामना करावा लागला नसेल. जीवन असेल तर सुख आणि दु:ख येतच राहतात. ज्याप्रमाणे रात्रीनंतर दिवस येतो, त्याच प्रकारे व्यक्तीच्या जीवनात सुख-दु:ख येत-जात असते. चाणक्यचा विश्वास आहे की, जर व्यक्ती संकटांविषयी जागरूक असेल आणि प्रत्येक परिस्थितीसाठी अगोदरच तयार असेल, तर अशा लोकांना संकट आल्यानंतर जास्त त्रास होत नाही.

धैर्य सोडू नका
चाणक्यच्या म्हणण्यानुसार, संकटात व्यक्तीने कधीही धैर्य सोडू नये. धैर्य नसल्यास संकट व्यक्तीला दाबून टाकते. संकटाला कधीही यशस्वी होऊ देऊ नये. संकट आल्यावर व्यक्तीने प्रत्येक काम संयमाने केले पाहिजे आणि संकट जाण्याची प्रतीक्षा करावी. संकटाच्या वेळी धैर्य गमावणाऱ्या लोकांचे नुकसान होते.

संकट काळात आपल्या लोकांची ओळख होते
चाणक्यच्या मते, संकट काळातच भाऊ, पत्नी, मित्र आणि नोकर यांची ओळख होते. चाणक्यचा असा विश्वास आहे की, जे तुमच्यावर खरे प्रेम करतात आणि विश्वास ठेवतात तेच संकट काळात तुमच्यासोबत उभे असतात. संकटाच्या वेळी जे साथ सोडतात आणि जे साथ देतात त्या दोन लोकांची नेहमीच काळजी घ्यावी.

पैसे वाचावा
चाणक्यच्या मते, व्यक्तीने अत्यंत विचारपूर्वकच पैसे खर्च केले पाहिजेत. पैसे संकटकाळात खर्‍या मित्राची भूमिका निभावतात. त्यामुळे पैसे जमा केले पाहिजेत. जे लोक पैशाची बचत करण्याऐवजी ते खर्च करतात, त्यांना संकटाच्या वेळी अडचणी येतात.