चाणक्य नीती : ‘अशी’ माणसं असतात सापांपेक्षा ‘विषारी’, त्यांच्यापासून दूर राहणे कधीही चांगले

पोलीसनामा ऑनलाइन – आचार्य चाणक्य यांनी जीवनाची मूल्ये सांगण्याबरोबरच जीवनाशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत. चाणक्यांनी विद्रूप व्यक्तीची तुलना विषारी जीवांशी केली आहे, तर त्यांनी स्त्रियांसाठी पती-आज्ञा आणि पतिव्रता धर्मास दागिना म्हणून वर्णन केले आहे. आचार्य चाणक्य यांनी याची व्याख्या वेगवेगळ्या श्लोकांमध्ये केली आहे, त्याबाबत जाणून घेऊया-

तक्षकस्य विषं दन्ते मक्षिकायास्तु मस्तके ।
वृश्चिकस्य विषं पुच्छे सर्वाङ्गे दुर्जने विषम् ।।

या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी वाईट व्यक्तीची विषारी जीवांशी तुलना केली आहे. चाणक्य म्हणतात की ज्याप्रमाणे साप, मधमाशी आणि विंचू विषाने भरलेले असतात त्याचप्रमाणे एक वाईट व्यक्ती देखील भयंकर विषाने भरलेली असते. फरक इतकाच आहे की सापाचे विष त्याच्या दातांमध्ये, मधमाशांचे मस्तकात आणि विंचूचे शेपटीत असते, तर वाईट व्यक्तीच्या संपूर्ण शरीरात विष असते. त्याच्या संपर्कात येणारी कोणतीही व्यक्ती त्याच्या दुष्परिणामांपासून वाचू शकत नाही, म्हणून माणसाने वाईट व्यक्तीपासून दूर रहावे.

पत्युराज्ञां विना नारी उपोष्य व्रतचारिणी !
आयुष्यं हरते भर्तुः सा नारी नरकं व्रजेत् !!

या श्लोकात चाणक्य यांनी पती-आज्ञा आणि पतिव्रता धर्म यांना स्त्रियांचे अलंकार म्हटले आहे. ते म्हणतात की जी स्त्री आपल्या पतीच्या अगदी छोट्या आज्ञा पाळते तिचे सार्वजनिक जीवन सुधारते. याउलट, जर ती पतीच्या परवानगीशिवाय व्रत-उपवास आदी करत असेल तर नवऱ्याच्या अकाली मृत्यूचे कारण ठरते. म्हणून पत्नीने पतीची आज्ञा आणि पतिव्रता धर्म या दोन्ही गोष्टी पाळल्या पाहिजेत; हाच पत्नी धर्म आहे.

न दानैः शुद्ध्यते नारी नोपवासशतैरपि ।
न तीर्थसेवया तद्वद् भर्तु: पादोदकैर्यथा ।।

पती सेवा ही सर्व शुभ कर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे. चाणक्य यांनी हेच वरील श्लोकात स्पष्ट केले आहे. चाणक्य म्हणतात की,जी स्त्री पती-धर्माचे पालन करून सतत पती-सेवेमध्ये लीन असते, तिला दान, उपवास, तीर्थ आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची आवश्यकता नसते. खरं तर, पती-सेवेच्या कल्पनेत स्वत:ला झोकून दिल्याने ती पूर्णपणे पवित्र होते.