Chanakya Niti : अशा लोकांचे जीवनही असते वाईट, दुसरेच घेतात फायदा, जाणून घ्या काय ‘चाणक्य’ धोरण

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीति ग्रंथात म्हणजेच ‘चाणक्य नीति’ मध्ये धन- संपत्ती, काम, कुटुंब, यश आणि अपयश सोबतच अनेक विषयांचा समावेश केला आहे. मनुष्य जीवनात त्यांची धोरणे उपयोगी मानली जातात. चाणक्य यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केल्याने अवघड कामही सहजतेने पार पडते. या नीति ग्रंथात ते मनुष्याच्या स्वभावासंदर्भात सांगतात.

नात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् ।
छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः ।।

चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, मनुष्याने अत्यंत सरळ आणि साधे देखील नसावे. जंगलात जाऊन पहा सरळ असणारी झाडे कापली जातात तर वेड्यावाकड्या झाडांना कोणी हात देखील लावत नाही. ते जास्त काळ उभी राहतात. त्यामुळे मनुष्याने अत्यंत साधे आणि सरळ देखील नसावे.

यामुळे सर्व लोक त्याला दुर्बल आणि मूर्ख समजतात. तसेच त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तर वाकड्या स्वभावाच्या व्यक्तीपासून प्रत्येकजण बचाव करण्याचा प्रयत्न करतो. अश्यात साधा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीचा प्रत्येकजण फायदा घेतो.